अशोक चव्हाण यांचा पंकजा मुंडेंना सल्ला: त्या हुशार, समजदार; कोणत्या घोड्यावर बसल्यामुळे फायदा होईल हे त्यांनी ठरवावे


23 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पंकजा मुंडे यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सातत्याने नवनवीन ऑफर येत आहेत. सुनील शिंदे, चंद्रकांत खैरे यांच्यानंतर आता कांग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी देखील पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्षपणे एक सल्ला दिला आहे, अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे की, पंकजा मुंडे हुशार आहेत. कोणत्या घोड्यावर बसल्यामुळे फायदा होऊ शकतो हे त्यांनी ठरवावे.

Advertisement

माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, पंकजा मुंडे मराठवाड्यातील भाजपच्या कर्तृत्ववान नेत्या आहेत. त्यांनी अनेक चांगली कामे केलेली आहेत. मी त्यांना सभागृहात अनेक वर्षांपासून पाहात आलो आहे. त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. कोणत्या पक्षात जावे आणि कोणत्या पक्षात नाही, हा निर्णय त्यांनीच घ्यावा.

भाष्य करणे उचित नाही

Advertisement

पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्या हुशार आहेत, समजदार आहेत. त्या राजकीय परिस्थिती जाणतात. त्यावर मी भाष्य करणे उचित नाही. त्यामुळे कोणत्या घोड्यावर बसल्यामुळे फायदा होऊ शकतो हे त्यांनी ठरवावे. असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडेंवर अन्याय

Advertisement

पंकजा मुंडे यांच्यावर सातत्याने भाजपकडून अन्याय होत असून पंकजा यांच्यासाठी मातोश्रीची दारे उघडी असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले होते. चंद्रकांत खैरे म्हणाले होते की, मराठवाड्यातील गावागावात भाजप पक्ष पोहोचवण्याचे काम स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यांची मुलगी पंकजा मुंडेंवर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे या खऱ्या युतीमधील खऱ्या वारस आहे. असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

पंकजा मुंडे मोठ्या नेत्या

Advertisement

ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी देखील पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. आमदार सुनील शिंदे म्हणाले, पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचे मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे भाजपच्या फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. हे आम्हाला दिसत आहे. पण हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे यांचे शिवसेना पक्षात स्वागत आहे. असे सुनील शिंदे म्हणाले.

भाजपच त्यांचे घर

Advertisement

या सर्व वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मातोश्रीचं दार त्यांच्यासाठी उघडे असले तरी त्या दाराने पंकजा मुंडे कधीही जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टी हेच त्यांचे घर आहे. मनातले मांडे मनातच राहणार आहेत. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटाच्या नेत्याची पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर

Advertisement

पंकजा मुंडेंवर भाजपमध्ये अन्याय होत आहे. मात्र हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी केले आहे. आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडेंना ही ऑफर दिली आहे. वाचा सविस्तर

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement