अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका: उघड्यावर ठेवलेला शेतमाल भिजल्याने नुकसान, विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा


नागपूर4 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अवकाळी पावसामुळे नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उघड्यावर ठेवलेले धान्य भिजले. लाल मिरची, तांदूळ आणि हरभऱ्याचे हजारो पोती अद्यापही उघड्यावरच आहे. विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा इशारा हवामान खात्यांना दिला आहे.

Advertisement

शेतकऱ्यांनी शेतातील कापणीला आलेले पीक बाजारपेठेत विकण्याचा सल्लाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. पण असे असताना नागपूरच्या एपीएमसीमध्ये अवकाळी पावसामुळे शेतमाल खराब होत आहे.

एपीएमसीमध्ये अतिरिक्त शेड

Advertisement

यावेळी लाल मिरचीचे पीक भरपूर आले आहे. पण लाल मिरची ठेवण्यासाठी शेड नसल्यामुळे लाल मिरचीची हजारो पोती भिजत असल्याची स्थिती आहे. आणखी दोन दिवस अवकाळी पाऊस येणार असल्याने शेतमाल खराब होण्याची भीती आहे. मागील अनेक वर्षापासूनची मागणी असताना नागपूरच्या कळमना एपीएमसीमध्ये अतिरिक्त शेड तयार करण्यात आलेले नाही.

संत्र्याचे भाव पाडले

Advertisement

अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा मोठ्या प्रमाणात एपीएमसी मध्ये विक्रीला आणला आहे. अवकाळी पावसामुळे संत्र्याचे दरही कमी झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागतो आहे. अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संत्रा एपीएमसीमध्ये आणत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी संत्र्याचे भाव पाडले आहेत.

शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री

Advertisement

सध्या 25 ते 40 रुपयांपर्यंत संत्रा प्रति किलो या दराने खरेदी केला जात आहे. या संदर्भात एपीएमसीचे संचालक अतुल सेनाड यांच्याशी संपर्क साधला असता शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला शेतमाल थोडाफार भिजला आहे असे सांगितले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement