अमरावती7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अवकाळीचे संकट आहे. शुक्रवारी (दि. 17) मध्यरात्री चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेळ शिवारात वादळासह गारपीट व पाऊस णला. त्यामुळे काढणीला आलेला गहू व हरभरा जमिनदोस्त होवून त्यांचे नुकसान झाले, तर संत्रादेखील गळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनाम्याला सुरूवात केली असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.
मागील तीन दिवसापासून तालुक्यातील वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे. तालुक्यातील पळसखेड येथे शुक्रवारी मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या वादळी पावसामुळे गहू अक्षरशः झोपला. त्यामुळे तो कसा काढायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उीाा ठाकला आहे. संत्रा, हरभरा, आंबा, लिंबू यासह फळ व पालेभाज्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसात झाले आहे. खरिपा पाठोपाठ अवकाळी पावसाने रब्बी हंगामाील गहू व हरभऱ्याचेही नुकसान झाल्याने मुलांचे शिक्षण, उदरनिर्वाह, पुढील खरिप हंगामातील पेरणी आदी अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहेत.
गेल्या खरिप हंगामात अतिवृष्टीमुळे सोबाबीनचे पिक हातचे गेले. कपाशीनेही दगा दिला. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा व गव्हावर आशा टिकवल्या होत्या, परंतु शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने त्या आशांवरदेखील पाणी फिरवले आहे.
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
खरिपा पाठोपाठ रब्बी हंगामातील गहू व हरभऱ्यानेही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा चालवावा, मुलांचे शिक्षण, शेतीचा खर्च आदी विविध प्रश्न शेतकऱ्यांपढे उभे झाले आहेत. काढणीला आलेला हरभरा व गहू पावसामुळे जमिनदोस्त झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले आहे.
पंचनाम्याला सुरूवात
प्रशासनाला माहिती मिळताच तत्काळ शनिवारी (दि. 19) सकाळी मंडळ अधिकारी अमोल देशमुख व पटवारी अरविंद सराड यांनी गावामध्ये जाऊन शेतीची पाहणी केली व पंचनामे करण्यास सुरूवात केली.
अंदाजे 80 हेक्टर मधील भाजीपाला, गहू, संत्र्याचे नुकसान झाले असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या वेळी उपसरपंच अमोल अडसड उपस्थित होते. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी, असे आवाहन त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना केले आहे.
पंचनाम्यांना झाली सुरूवात
जवळपास अंदाजे 80 हेक्टरमधील पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले दिसून येत आहे. सध्या पंचनामे सुरू आहेत.
अरविंद सराड, पटवारी