अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; चूल पेटवत महागाईविरोधात घोषणाबाजी


4 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सिलेंडरच्या वाढलेल्या दराचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावरच चुल पेटवली.

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी, शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव द्यावा, वाढलेली महागाईवरून आज विरोधक आक्रमक झालेत. त्यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच चूल पेटवून सरकारचा निषेध केला. विधिमंडळ अधिवेशनातली प्रत्येक घडामोड जाणू घेऊयात.

Advertisement

LIVE

Advertisement

– गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच चूल पेटवली व सरकारचा निषेध केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले आहे.

– आंदोलनात विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन न देणाऱ्या सरकारचा तसेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

Advertisement

– विधानसभेतील कामकाजादरम्यान‎ मंत्री‎ अनुपस्थित राहण्यावरून बुधवारी विधानसभेत‎ सलग दुसऱ्या दिवशी‎ पडसाद उमटले.‎ ‎ मंगळवारी दहा‎ ‎ मिनिटांचे कामकाज‎ ‎ स्थगित केल्यानंतर‎ ‎ बुधवारी (ता. 15)‎ केवळ एक लक्षवेधी आटोपून विशेष‎ सभेचे कामकाज मंत्र्यांअभावी स्थगित‎ करण्याची वेळ राज्य सरकारवर आली.‎ परिणामी देवेंद्र फडणवीस यांना‎ याप्रकरणी सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. या प्रकरणावरून ‎विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‎ ‎ शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा एकदा‎ धारेवर धरत हा तर निर्लज्जपणाचा‎ कळस झाल्याची टीका पवारांनी केली.‎ कालच्या लक्षवेधींचा मुद्दा आज पुन्हा सभागृहात उपस्थित होणार असल्याची शक्यता आहे.

– अजित पवार बुधवारी म्हणाले होते की, या‎ विधिमंडळाकडे संपूर्ण महाराष्ट्र बघत‎ असतो. आज सकाळी साडेनऊला‎ कामकाज सुरू झाले. मुख्यमंत्री,‎ उपमुख्यमंत्री यांना जास्त व्याप असतो‎ याची जाणीव आहे. परंतु ते नसले तरी‎ संसदीय कार्यमंत्री तरी किमान‎ साडेनऊला येऊन बसले पाहिजेत.‎ चंद्रकांत पाटील यांच्यावर आमचा‎ आरोप नाही, परंतु जबाबदारी घेतली तर‎ त्यांनी आले पाहिजे. सहा मंत्री गैरहजर‎ राहतात, सरकारला ‘जनाची नाही तर‎ मनाची तरी वाटत नाही का?” अशी‎ टीका अजित पवारांनी केली.

Advertisement

– अजित पवार आक्रमक होताच यापुढे संबंधित मंत्र्यांना योग्य त्या सूचना‎ देण्यात येतील, अशी माहिती फडणवीसांनी‎ सभागृहाला दिली. अधिवेशन काळात‎ अनेक मंत्र्यांकडून बैठका आणि इतर‎ आश्वासने दिली जातात. ती पूर्ण होत‎ आहेत की नाही याबाबत सविस्तर‎ आढावा घेतला जाईल. अधिवेशनाच्या‎ काळातच या बैठका घेण्यासंदर्भात‎ सूचना करण्यात येतील, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा:

Advertisement

जुनी पेन्शन:सरकारकडून चर्चेचे निमंत्रण नाही, कर्मचाऱ्यांचा निर्धार कायम; नगर परिषदांचे कर्मचारीही संपामध्ये उतरले

– सोमवारपासून राज्यात शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुरू असलेला संप बुधवारी (१५ मार्च) तिसऱ्या दिवशी कायम होता. संपकऱ्यांना अद्याप चर्चेचे निमंत्रण मिळालेले नसून त्यांचा संपाचा निर्धार कायम आहे. राज्यातील नगर परिषदांचे सर्व कर्मचारी संपात सामील झाल्याने संपकरी कर्मचाऱ्यांची संख्या 19 लाखांवर गेली आहे. वाचा सविस्तर

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement