अर्जुन तेंडुलकरला संपूर्ण आयपीएल मागची आणि ही बाकावर काढावी लागल्याने सचिनने त्याला दिला मोलाचा सल्ला

अर्जुन तेंडुलकरला संपूर्ण आयपीएल मागची आणि ही बाकावर काढावी लागल्याने सचिनने त्याला दिला मोलाचा सल्ला
अर्जुन तेंडुलकरला संपूर्ण आयपीएल मागची आणि ही बाकावर काढावी लागल्याने सचिनने त्याला दिला मोलाचा सल्ला

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण काही झाले नाही. आयपीएल २०२१मध्ये बाकावर बसवून ठेवल्यानंतर यंदातरी मुंबई इंडियन्स अर्जुनला पदार्पणाची संधी देतील असे अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत वाटत होते. पण, अर्जुनच्या मागून आलेल्या हृतिक शोकिन, कुमार कार्तिकेय आदी युवा खेळाडूंनी आयपीएल २०२२मध्ये मुंबई कडून पदार्पण केले. त्यात आता अर्जुनला मुंबईच्या रणजी संघातूनही वगळले. अशात सचिनने आपल्या मुलाला मोलाचा सल्ला दिला आहे.

”हा मार्ग आव्हानात्मक आहे, हे मी नेहमीच अर्जुनला सांगतो, तो आणखी खडतर असेल… तुला हा खेळ आवडतो म्हणून तू तो खेळायला सुरुवात केली. असेच करत राहा, मेहनत करत राहा आणि कष्टाचं फळ मिळेल,”असा सल्ला तेंडुलकरने ‘SachInsight’या कार्यक्रमात बोलताना अर्जुनला दिला. सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक आहे, परंतु संघ निवडीत आपला कोणताच हस्तक्षेप नसल्याचे त्याने स्पष्ट केले. अर्जुनला ३० लाखांत मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२मध्ये करारबद्ध केले. पण, आयपीएल २०२१प्रमाणेच त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही.

Advertisement

तुला अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना आवडले असते का, या प्रश्नावर तेंडुलकर म्हणाला,”हा वेगळा प्रश्न आहे. मी काय विचार करतो किंवा मला काय वाटते, हे महत्त्वाचे नाही. हे पर्व संपले आहे.” ”तुम्ही संघ निवडीबाबत बोलत असाल, तर मी कधीच त्यात ढवळाढवळ करत नाही. ते काम संघ व्यवस्थापनाचे आहे आणि ते तसेच नेहमी सुरू असते,”असेही तेंडुलकरने स्पष्ट केले.

रोहित शर्माने आयपीएल २०२२मध्ये २२ वर्षीय अर्जुनवर एका सामन्यासाठीही विश्वास दाखवला नाही. आता रणजी करंडक स्पर्धेच्या बाद फेरीसाठी निवडलेल्या मुंबईच्या संघातूनही त्याला वगळण्यात आले आहे. पृथ्वी शॉ उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत मुंबईचे नेतृत्व करणार आहे. रणजी करंडक स्पर्धेसाठी आधी जाहीर केलेल्या संघात अर्जुनचे नाव होते, परंतु त्याला एकाही सामन्यात खेळवले गेले नाही. बाद फेरीसाठी निवडलेल्या संघात अर्जुनच्या जागी सर्फराज खानचा भाऊ मुशीर खान याची निवड झाली आहे.

Advertisement

मुंबईचा संघ ( Mumbai’s squad for Rajni Trophy knockouts) – पृथ्वी शॉ ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, भुपेन लालवानी, अरमान जाफर, सर्फराज खान, सुवेद पारकर, आकर्षित गोमेल, आदित्य तरे, हार्दिक तामोरे, अमन खान, साईलाज पाटील, शाम्स मुलानी, ध्रुमील मातकर, तनुष कोटियान, शशांक आतार्डे, धवल कुलकर्णी, तुषार देषपांडे, मोहित अवस्थी, रॉयस्टन डाएस, सिद्धार्थ राऊत, मुशीर खान

Advertisement