अमेरिका अफगाणिस्तानला 470 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार, इतरही अनेक देशांकडून घोषणा


  Advertisement

  US Help Afghanistan : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सरकारची स्थापना केल्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानातील लोकांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉम्पसन-ग्रीनफील्डनं यासंदर्भात बोलताना सांगितलं की, अमेरिका अफगाणिस्तानातील जनतेसाठी 64 दशलक्ष डॉलर्सची (जवळपास 470 कोटी रुपये) मानवतावादी मदत देण्यासाठी तयार आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, अफगाणिस्तानातील परिस्थित अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत अमेरिका 64 दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याचं वचन देते. 

  अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉम्पसन-ग्रीनफील्डनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “मला ही घोषणा करताना गर्व होतोय की, अमेरिका अफगाणिस्तानातील लोकांसाठी नवीन मानवतावादी मदत म्हणून 64 दशलक्ष डॉलर्स देत आहे. हा नवीन निधी संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांच्या कार्याला पाठिंबा देईल. आम्ही इतर देशांनाही एकता दाखवून मदत करण्याचं आवाहन करतो.”

  Advertisement

  अमेरिकेपूर्वी संयुक्त राष्ट्र प्रमुख, न्यूझीलंड, चीन, जर्मनीनं देखील अफगाणिस्तानला आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, भारताच्या वतीनं अद्याप यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. 

  संयुक्त राष्ट्र प्रमुखांकडून अफगाणिस्तानला 20 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देण्याची घोषणा 

  Advertisement

  संयुक्त राष्ट्र महासचिव एंतोनियो गुतेरेस यांनी सोमवारी अफगाणिस्तानात मानवीय अभियानाचं समर्थन करण्यासाठी दोन कोटी अमेरिकी डॉलर्सचे वाटप जाहीर केलं. युद्धग्रस्त देशात, ‘खऱ्या’ अधिकाऱ्यांनी लोकांना मदत पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याचं ‘वचन’ दिलं आहे. ते म्हणाले की, “अफगाणिस्तानातील लोकांना एका जीवन रेखेची गरज आहे. अनेक दशकांच्या युद्ध, दुःख आणि असुरक्षिततेनंतर त्यांना कदाचित त्यांच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक काळाचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानं आता त्यांच्या पाठिशी उभं राहणं आवश्यक आहे.”

  दरम्यान, चीननं 200 दशलक्ष युआन (31 दशलक्ष डॉलर्स) ची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. तसेच न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री नानैया महुता यांनी सोमवारी बोलताना म्हटलं की, अफगाणिस्तानला मदतीच्या स्वरुपात 3 दशलक्ष डॉलर्स देण्याची घोषणा करत आहे. 

  Advertisement

  महत्त्वाच्या इतर बातम्या :   Source link

  Advertisement

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here