अमित शहांच्या दौऱ्याचा कराडांनी घेतला आढावा: संभाजीनगरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम; 50 हजार लोक सहभागी होणार

अमित शहांच्या दौऱ्याचा कराडांनी घेतला आढावा: संभाजीनगरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम; 50 हजार लोक सहभागी होणार


औरंगाबाद10 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुक्ती संग्रामाच्या समारोहाच्या कार्यक्रमासाठीचा आढावा बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी विभागीय आयुक्तालयात घेतली. मुक्तीसंग्राम निमित्ताने मराठवाड्यात सर्वत्र जोरदार कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यावेळी मुक्तिसंग्रामाच्या समारंभासाठी मराठवाड्यातून 50 हजार लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा कराड यांनी केला आहे. या बैठकीला विभागीय आयुक्त मधुकर आर्दड जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मनपा आयुक्त जी.श्रीकांत भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यासह विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Advertisement

भाजपच्या वतीनेही शक्तीप्रदर्शन

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे भाजप पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात लोक सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे हा सरकारी कार्यक्रम असला तरी त्याचबरोबर भाजप यानिमित्ताने पुन्हा शक्तीप्रदर्शन करु पाहत आहे.

Advertisement

सध्याकाळी चार वाजता होणार सभा

रिद्धी-सिद्धी लॉन्सवर हा कार्यक्रम होणार आहे. चार ते सहा वाजेपर्यंत हा समारोपाच्या सभेचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. तसेच 16 तारखेला सकाळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 16 तारखेला विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अवधूत गुप्ते यांचा तर क्रांती चौकात लेझर-शो यासारखे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.

Advertisement

कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

भागवत कराड म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा हा समारोप असणार आहे. त्यामुळे या मुक्तीसंग्रामाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला मराठवाड्यातील सर्व लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आव्हानही त्यांनी घेतले.

AdvertisementSource link

Advertisement