छत्रपती संभाजीनगर13 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर दौरा होता. याबाबत शहा यांच्या कार्यालयाकडून दौरा देखील जाहीर करण्यात आलेला होता. मात्र, त्यांचा हा संभाजीनगर दौरा रद्द झाला आहे. 17 सप्टेंबर रोजी अमित शहा यांचे तीन राज्यात कार्यक्रम असल्याने वेळेचे नियोजन होत नसल्याने अखेर यातील संभाजीगनर दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहांच्या आगमनासाठी व त्यांच्या दौऱ्यासाठी प्रशासनासह भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू होती. तर आता ऐनवेळी दौरा रद्द झाल्याची सांगितले जात आहे.
निवडणुकांच्या अनुषंगाने नेत्यांचे दौरे वाढले
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांचे दौर वाढले आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील नेत्यांचे देखील राज्यात होणारे दौरा वाढतांना पाहायला मिळत आहे. अशातच गृहमंत्री अमित शाहा यांचा 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर दौरा ठरला होता. स्थानिक भाजप नेत्यांकडून याबाबत माध्यमांना माहिती देखील देण्यात आली होती. सोबतच अमित शाहा यांचा संपूर्ण दौरा देखील आला होता.
मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला येणार होते
या दौऱ्यात ते मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. तसेच शाह यांच्या सभेची देखील भाजपकडून तयारी करण्यात आली होती. मात्र, आता हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती समोर येत असून, भाजपकडून नेत्यांकडून देखील याला दुजोरा देण्यात आला आहे.
एकाच दिवसात तीन राज्यांचा दौरा शक्य नाही
अमित शहा यांचा दौरा रद्द झाल्याबाबत भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे. 17 सप्टेंबरला अमित शाह हे बिहार दौऱ्यावर असणार आहे. सकाळचे सर्व कार्यक्रम त्यांचे बिहारमध्ये होणार असून, सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर ते छत्रपती संभाजीगर दौरा करुन, पुढे तेलंगणाला जाणार होते. मात्र, एका दिवसांत तीन राज्यांच्या दौरा करताना वेळेचे नियोजन होत नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भाजप पदाधिकाऱ्याकंडून झाली होती जोरदार तयारी
मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी चिकलठाणा भागात भव्य सभा होणार होती. त्यांचा दौरा गृह मंत्रालयाने जाहीर केला होता. ज्यात 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता बिहारमधील दरभंगा विमानतळावरून विशेष विमानाने संध्याकाळी औरंगाबाद विमानतळावर उतरणार होते.
त्यानंतर मोटारीने एमआयडीसी चिकलठाणा भागातील सभेच्या ठिकाणी दाखल होणार होते. संध्याकाळी 5 ते 6.30 या दरम्यान ही सभा होणार होती. त्यानंतर ते विमानतळावरून विशेष विमानाने हैदराबादकडे रवाना होणार होते. सभेसाठी भाजपसह प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, आता दौराच रद्द झाला आहे.