अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक: निरीक्षकांकडून पूर्वतयारीचा आढावा; मतदान केंद्रांचीही पाहणी


अमरावती24 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची एकूण प्रशासकीय तयारी, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन आणि इतर बाबी काटेकोरपणे पाळाव्यात, असे निर्देश निवडणूक निरीक्षक तथा वरिष्ठ सनदी अधिकारी पंकज कुमार यांनी आज, गुरुवारी येथे दिले. बैठकीनंतर पंकज कुमार यांनी शहरातील काही मतदान केंद्रांनाही भेटी दिल्या.

Advertisement

निवडणुकीच्या अनुषंगाने निरीक्षक पंकजकुमार यांचे गुरुवारी सकाळी शहरात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे निवडणूक प्रशासनाची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला, तसेच विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यानथन, उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भाकरे आदी उपस्थित होते.

बैठकीत प्रशासनाकडून करण्यात आलेली पूर्वतयारी, मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्र, आदर्श आचारसंहिता कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, प्रशिक्षण कार्यक्रम आदी विविध बाबींची माहिती दिली. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्यादृष्टीने काटेकोर कारवाई व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले. नियोजित मतदान केंद्रांच्या अनुषंगाने शहरातील गणेशदास राठी विद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आदी विविध स्थळांची निवडणूक निरीक्षक पंकज कुमार यांनी पाहणी केली.

Advertisement

बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, संतोष काकडे, रवी महाले, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त विजय शिखरे आदी उपस्थित होते.

मतदान, मतमोजणीलाही येणार

Advertisement

निवडणूक निरीक्षक पंकज कुमार हे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेऊन आहेत. आजच्या दौऱ्यानंतर ते मतदान आणि मतमोजणीच्या दिवशीही अमरावतीत तळ ठोकूण असतील. दरम्यानच्या काळात पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघातील प्रत्येक जिल्ह्यात ते जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement