अमरावतीत 17 सप्टेंबरला ‘पीएम स्कील रन’ चे आयोन: कौशल्य विकास योजनेच्या प्रचारासाठी धावणार 4 हजार अमरावतीकर, स्पर्धा नि:शुल्क

अमरावतीत 17 सप्टेंबरला ‘पीएम स्कील रन’ चे आयोन: कौशल्य विकास योजनेच्या प्रचारासाठी धावणार 4 हजार अमरावतीकर, स्पर्धा नि:शुल्क


अमरावती36 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेचा प्रचार करण्यासाठी आगामी रविवारी 17 सप्टेंबर रोजी ‘पीएम स्कील रन’ या मॅराथॉन दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडमध्ये सुमारे ४ हजार विद्यार्थी, पालक आणि अधिकारी-कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती अमरावती विभागाचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांनी आज, बुधवारी येथे दिली.

Advertisement

कौशल्य व रोजगार उद्योजकता तथा नाविन्यता विभागातर्फे बुधवारी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘पीएम स्कील रन’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील शासकीय आयटीआयच्या आवारातून सकाळी ७ वाजता या दौडचा शुभारंभ होईल. कौशल्याला सन्मान, समृध्दी प्राप्त व्हावी, कौशल्य प्रशिक्षणाबाबत व्यापक जनजागृती व्हावी, हा या दौडचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. ही दौड सर्वांसाठी खुली असून ती नि:शुल्क आहे. दौडचा मार्ग आयटीआय, पंचवटी चौक, विभागीय आयुक्त कार्यालय रोड, गर्व्हनमेंट गर्ल्स हायस्कुल आणि परत आयटीआय असा आहे. अशाप्रकारे ५ किलोमीटर लांबीच्या या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार व एक हजार रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. या मॅराथॉनमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी आयटीआयचे विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. मॅराथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला डिजीटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेला आयटीआयचे उपसंचालक एस. के. बोरकर, सहायक संचालक आर. एम. लोखंडे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी डॉ. आर. ई. शेळके, उपप्राचार्य आर. जी. चुलेट, एस. एन. बोराडे, अधीक्षक एम. आर. गुढे, विद्याभारती आयटीआयचे प्राचार्य जी.बी. तंवर, एसएल आयटीआय बडनेराचे दहीकर, शिल्प निदेशक रवींद्र दांडगे आदी अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

दीक्षांत समारंभाचेही आयोजन

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सकाळी ११ वाजता आयटीआय उत्तीर्णांच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळात आयटीआयमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीयुक्त अभ्यासिका निर्माण करण्यात येणार आहेत. विभागातील ६३ पैकी ५२ आयटीआयमध्ये स्मार्ट क्लासरुमच्या निर्मितीतून विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

AdvertisementSource link

Advertisement