अमरावतीत भीषण अपघात: विवाह सोहळ्यावरुन परतणाऱ्यावर काळाचा घाला, ट्रक – पिकअपच्या अपघातात 5 ठार, 8 जखमी


अमरावती44 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

टाटा एस या मालवाहू वाहनावर आयशर ट्रक आदळल्यामुळे एकाच कुटुंबातील 5 जण ठार झाले. तर उर्वरित जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी मध्यरात्री अंजनगाव सुर्जी-दर्यापुर रस्त्यावर इटकी फाट्यावर घडला. जखमींवर अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात (पीडीएमसी) उपचार सुरु आहेत.

Advertisement

टाटा एस चालक शेख अजहर शेख अनवर (वय ३३), पत्नी नासीया परवीन शेख अजहर (वय २५), मुलगी अनशरा परवीन शेख अजहर (वय ९), चालकाची आई नफीसा परवीन शेख अनवर (वय ५४), पुतण्या शेख अनस शेख असलम (वय २) सर्व रा. टाटानगर, बाभळी-दर्यापुर अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जखमींमध्ये बहिण सायमा परवीन वकील खाँ (वय २४) रा. वलगाव, आसमा परवीन शेख शकील (वय २६), आयशा परवीन शेख शकील (वय ३) दोन्ही रा. काकनवाडा, मुसकान परवीन शेख असलम (वय २१), अलमास परवीन शेख अजहर (वय.२), अशमीरा परवीन शेख शकील (वय ५), शेख एजाज शेख अब्बास (वय ७५), आसना शेख अजहर (वय ७) यांचा समावेश असून त्यांना पुढील उपचाराकरिता अमरावती येथील पीडीएमसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेला कारणीभूत ठरलेला आयशरचा चालक घटनास्थळावरुन पसार झाला.

अंजनगाव सुर्जी येथील विवाह समारंभ आटोपून हे कुटुंब टाटा एस या मालवाहू वाहनाने दर्यापुर येथील घरी परतत होते. परंतु मध्येच त्यांच्या वाहनावर ट्रकने घाला घातला. त्यामुळे एकाचवेळी पाच जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. या अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्या अलमास परवीन व अशमीरा परवीन यांचे मातृ-पितृ छत्र हरवल्या गेल्याने दर्यापुरवासी सुन्न झाले आहेत. दरम्यान आज, मंगळवारी दुपारी येथील कब्रस्तानात अत्यंत शोकाकूल वातावरणात मृतांचा सामुहिक दफनविधी करण्यात आला.

AdvertisementSource link

Advertisement