अमरावती7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
विदर्भ कला शिक्षक संघाच्या स्थानिक शाखेच्यावतीने आयोजित चित्र रंगभरण स्पर्धेत सुमारे 20 हजार विद्यार्थी सहभागी झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग प्राप्त होणारी अमरावतीची ही पहिलीच स्पर्धा ठरली.
दरम्यान या स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त 350 विद्यार्थी व कला शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांचा सन्मान आगामी शनिवार, 11 मार्च रोजी सकाळी 11 ते 2 या वेळात श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृह, श्री शिवाजी शिक्षण संस्थेसमोर, अमरावती येथे केला जाणार असल्याचे जिल्हाकार्यवाह अभय गादे यांनी कळविले आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा विकास व्हावा, त्यांच्यात सृजनशिलता वाढावी व विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमानाची मुल्ये रुजविली जावी या उद्देशाने इयत्ता 5 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पार पडलेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल्ल कचवे व उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले, असे कलाध्यापक संघाचे म्हणणे आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सक्रीय सहकार्यामुळेच या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 130 शाळांमधील 20 हजार विद्यार्थी सहभागी झाले. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरीता विदर्भ कला शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष विनोद इंगोले, विभागीय कार्यवाह तेजस काळे, एस. आर. पाटील, कैलास पेंढारकर, जिल्हाध्यक्ष संजय श्रीखंडे, जिल्हासचिव अभय गादे, स्पर्धा प्रमुख राजेश ढिगवार, शहर अध्यक्ष सुनील मुंदावने, सहसचिव अमोल देशपांडे, शहर सचिव चंदन राठोड, उपाध्यक्ष सचिन चोपडे, चक्रधर हिवसे, कोषाध्यक्ष वैभव काळे, कार्याध्यक्ष आशिष देशमुख, श्रीमती किरण काळे, सुचिता सव्वालाखे, चंदन राठोड, अजय जिरापुरे, संदीप राऊत, विष्णू सालपे, प्रमुख ठाकरे, उज्वल पंडेकर, जगदीश माळोदे, अनिल डकरे, कमलाकर महाजन, कुणाल राजनेकर, मुकेश वसमतकर, आशिष पंचारिया, अजय जिरापूरे, सुधाकर दवंडे, संजय काळे, केशव चव्हाण, प्रविण इंगळे, संजय धाकुलकर, विलास खोडस्कर, संजय रामावत, शक्तीवंत वानखडे, हरीष फुटनाईक, सतीश नेतनराव, सी. सोनाली खोरगडे, गजानन खलोलकर, अमोल तावडे, सुनिता काटोले, निता घुरडे, प्रविण उभाडकर आदींनी अथक परिश्रम घेतले.
जिरापुरे, चोपडे यांनी केले रेखांकन
सदर स्पर्धेतील चित्राचे रेखांकन अजय जिरापुरे (सेफला हायस्कूल, धामणगाव रेल्वे), सचिन चोपडे (शिवाजी हायस्कूल मोर्शी) यांनी केले. या स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त 350 विद्यार्थी व कला शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सन्मान आगामी 11 मार्च रोजी सकाळी 11 ते 2 या वेळात केला जाणार आहे.