अमरावतीचे 3 संघ बेसबाॅल स्पर्धेत राज्यस्तरावर: शासनाच्या क्रीडा विभागाच्या शालेय स्पर्धेत चंद्रभानजी विद्यालयाचे तिहेरी यश


अमरावती3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

स्पर्धेतील विजयी खेळाडू यांचे संस्थेचे पदाधिकारी दिलीपबाबू इंगोले यांच्यासोबत घेतलेले छायाचित्र. सोबत क्रीडा शिक्षक. 

अमरावतीहून जवळच असलेल्या कुंड सर्जापूर येथील चंद्रभानजी विद्यालयाने शासनाच्या क्रीडा विभागातर्फे आयाेजित शालेय बेसबाॅल स्पर्धेत तिहेरी यश संपादन केले आहे. 14 वर्षाआतील मुले व 17 वर्षाआतील मुले आणि मुलींच्या संघाने विभागीय स्पर्धेत दणदणीत विजय संपादन करीत राज्यस्तरावर प्रवेश मिळविला.

Advertisement

गेल्या 14 वर्षांपासून साॅफ्टबाॅल व बेसबाॅल या खेळात जिल्हास्तरावर अजिंक्यची परंपरा असलेल्या चंद्रभानजी विद्यालयाच्या संघाने ही परंपरा कायम राखीत विभागीय स्पर्धेत मजल मारली. यवतमाळ येथे झालेल्या विभागीय बेसबाॅल स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलांच्या संघाने तर 17 वर्षाआतील मुले व मुलींच्या दाेन्ही संघानी प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी मात करीत राज्यस्तरीय स्पर्धेची फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या शाळेच्या सुमारे 750 हून अधिक विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर तर 40 हून अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे.

Advertisement

निवड झालेल्या 17 वर्षाआतील मुलांच्या संघामध्ये आदेश तायडे, आयुष देशमुख, आर्यन मकेश्वर, साहिल वाणे, गाेविंद गंगेलेे, तेजस थाेपाडे, देविदास भुस्कटे, यथार्थ मेश्राम, यश शिरसाठ, रुद्र दाबेराव, राेहित पारिसे, विशेष काळबांडे, वेदांत शिखरे, साहिल कदम, सुयाेग वानखडे तर मुलींचा संघात अनुष्का डाेमसंधे, आचल मानकर, गुंजन मानकर, तनुजा मेश्राम, तेजस्वीनी तऱ्हेकर, त्रिशा तायडे, पायल मेहरे, पुजा बघेले, राधा पारिसे, राधिका खाेरगडे, राधिका माहाेरे, शर्वरी मानकर, समीक्षा दुधबावणे, समीक्षा गजभिये, सलाेनी सैरिसे, सृष्टी कदम यांचा समावेश आहे.

याशिवाय 14 वर्षाआतील मुलांच्या संघात संगम घेबड, तन्मय मानकर, प्रथमेश मानकर, जय गाेंडाणे, यश थाेपाडे, यश मानकर, राैनक तायडे, लकी अठाेर, वेदांत अमझरे, वैभव केवट, श्रीजीत देवतळे, श्रेयस देवतळे, सम्यक अठाेर व सर्वेश केवदे यांचा समावेश आहे.

Advertisement

हे सर्व विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच चंद्रभानजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शरद गढीकर व प्रशिक्षक विक्की सैरीसे यांना देतात. या यशाबद्दल श्रीराम मंदिर ट्रस्ट, कुंड सर्जापूर व शाळा समितीचे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे काेषाध्यक्ष दिलीपबाबू इंगाेले, शाळेचे मुख्याध्यापक एन.टी. चव्हाण, बेसबाॅल संघटनेचे इंद्रजित नितनवार, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय खाेकले, शाळेतील शिक्षकवृंद एस.पी. लाजूरकर, व्ही.के. राठाेड, ए.पी. मांगे, के.एस. लाजूरकर, आर.एस. मानकर, ए.व्ही. राजगुरे शिक्षकेत्तर कर्मचारी सी.ए. शेंडे व आर.आर. मडावी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement