अभिनेते परेश रावल यांचा ठाकरे सरकारला सवाल: म्हणाले- 50 टक्के क्षमतेने बार आणि थिएटर्स उघडू शकतात, तर जिम का नाही?


Advertisement

33 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे महाराष्ट्र सरकारने शनिवारी नवीन नियम लागू केले होते. सरकारी परिपत्रकात असे म्हटले होते की थिएटर, रेस्टॉरंट आणि बार 50 टक्के क्षमतेने उघडले जाऊ शकतात. तर स्विमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स बंद राहतील. या बदलांवर प्रतिक्रिया देताना परेश रावल यांनी जिम बंद करण्यामागील तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Advertisement

मात्र, राज्य सरकारने रविवारी पुन्हा सुधारीत आदेश जारी केले आहे. यामध्ये जिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंध मागे घेण्यात आले आहे आणि 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे

काय म्हणाले होते परेश रावल?
परेश रावल यांनी ट्विट करुन, “ट्रेन, थिएटर्स आणि बार आणि रेस्टॉरंट इत्यादींना 50% क्षमतेने उघडे ठेवण्याची परवानगी आहे पण जिम नाही!!! यामागे काय तर्क आहे? आरोग्याची काळजी घेणे गुन्हा आहे का? ही अत्यावश्यक सेवा नाही का?”

Advertisement

कोविडशी झुंज देत आहे बॉलीवूड
नव्या लाटेचा परिणाम बॉलिवूडमधील चित्रपटांच्या शूटिंगवर झाला आहे. त्यामुळे ‘जर्सी’, ‘पृथ्वीराज’, ‘आरआरआर’ आणि ‘राधे श्याम’ या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे, तर ‘टायगर 3’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे शूटिंग स्थगित करण्यात आले आहे. . अलीकडच्या काळात, जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल, एकता कपूर, मृणाल ठाकूर, मधुर भांडारकर, नफिसा अली आणि अरिजित सिंग यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाचा फटका बसला आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement