अफगाणी जिलेबीने गुजरात टायटन्सला विजयी करत हैदराबादच्या तोंडचा घास हिरावला

अफगाणी जिलेबीने गुजरात टायटन्सला विजयी करत हैदराबादच्या तोंडचा घास हिरावला
अफगाणी जिलेबीने गुजरात टायटन्सला विजयी करत हैदराबादच्या तोंडचा घास हिरावला

राहुल तेवतिया आणि राशिद खानने शेवटच्या षटकात २२ धावांची गरज असताना मार्को येनसेनला तीन षटकार ठोकत सामना १ चेंडूत ३ धावा असा आणला. त्यानंतर राशिद खानने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत सामना जिंकून दिला. गुजरातच्या राशिद खान आणि राहुल तेवतियाने शेवटच्या दोन षटकात ३५ धावा ठोकत हैदराबादचा विजयी घास हिसकावून घेतला. राशिद खानने शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकत हैदराबादचे १९६ धावांचे आव्हान पार केले. हैदराबादकडून उमरान मलिकने ४ षटकात २५ धावा देत ५ विकेट घेतल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कारदेण्यात आला. मात्र मार्को येनसेनने त्याच्या कष्टावर पाणी फेरले. अखेरच्या षटकात २५ धावा दिल्या.

त्याआधी उमरान मलिकने आपल्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिनव मनोहरचा शुन्यावर त्रिफळा उडवत गुजरातचा निम्मा संघ एकट्यानेच उडवला. १४४.२ किमी प्रति च्या वेगाने चेंडू टाकून त्याने गिलचा त्रिफळा उडवला आणि त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला जखमी केले. पुढील षटकात हार्दिकची विकेट घेत उम्रानने हैदराबादला मोठे यश मिळवून दिले त्यामुळे गुजरातची अवस्था ५ बाद १४० धावा अशी झाली. वृद्धीमान साहाने २८ चेंडूत अर्धशतक ठोकत गुजरातला मजबूत स्थितीत नेले. गुजरातचा सलामीवीर वृद्धीमान साहाची अखेर बॅट तळवपली. हैदराबादचे १९५ धावांचे मोठे आव्हान पार करताना गुजरातने पॉवर प्लेमध्ये बिनबाद ५९ धावा केल्या. त्यात वृद्धीमान साहाच्या १८ चेंडूत केलेल्या ३९ धावांचा मोठा वाटा आहे.

Advertisement

गुजरात टायटन्सने सनराईजर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला मोहम्मद शामीने ५ धावांवर बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर अभिषेक शर्मा आणि एडिन माक्ररमने डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ भागीदारी रचली. त्यामुळे हैदराबादने १५ व्या षटकात १४० धावांचा टप्पा पार केला होता. अभिषेक शर्माने ४२ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. मात्र अभिषेकला जोसेफने बाद करत ही जोडी फोडली. हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने दमदार अर्धशतक ठोकत हैदराबादला १२ व्या षटकात ११२ धावांपर्यंत पोहचवले होते. शशांक सिंहने फर्ग्युसनच्या शेवटच्या षटकात शेवटच्या तीन चेंडूत तीन षटकार ठोकत हैदराबादला १९५ धावांपर्यंत पोहचवले. शशांकने ६ चेंडूत २५ धावा ठोकल्या.

Advertisement

यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त यश दयाल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी १ विकेट खिशात घातली. या विजयासह गुजरात टायटन्सने गुणतालिकेत पुन्हा एकदा टॉप केला आहे. तसेच, सनरायझर्स हैदराबाद संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement