अपराजित गुजरात टायटन्स संघ ठरतोय इतर संघांसाठी ठरतोय धोकादायक

अपराजित गुजरात टायटन्स संघ ठरतोय इतर संघांसाठी ठरतोय धोकादायक
अपराजित गुजरात टायटन्स संघ ठरतोय इतर संघांसाठी ठरतोय धोकादायक

आयपीएलच्या १५व्या हंगामात आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर रात्री साडे सात वाजता लढत होत आहे. आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत सर्वात यशस्वी ठरलेला आणि विजयाची हॅटट्रिक करणारा हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असेल. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर आज सोमवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात विजय मिळून गुजरातला विजयी चौकार मारण्याची संधी आहे.

आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. अखेरच्या लढतीत पंजाब किंग्जविरुद्ध राहुल तेवतियाने २ चेंडूत २ षटकार मारून सनसनाटी विजय मिळून दिला होता. पंजाबविरुद्धच्या विजयानंतर गुजरात संघाने अन्य संघांना इशारा दिला आहे. कोणत्याही क्षणी ते सामन्याचे चित्र पालटू शकतात. दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबादने सलग दोन पराभवानंतर चेन्नी सुपर किंग्जवर मात केली होती. चैन्नईविरुद्ध हैदराबादने फलंदाजी आणि गोलंदाजीत एकाच वेळी चांगली कामगिरी केली. आज त्यांची लढत गुजरात सारख्या तगड्या संघाविरुद्ध होणार आहे.

Advertisement

कर्णधार हार्दिक पंड्याच्या आक्रमक नेतृत्वाखाली गुजरातने सलग ३ विजय मिळवले आहेत. या हंगामात आतापर्यंत एकही पराभव न स्विकारणारा तो पहिला संघ आहे. गुजरात संघाकडे अखेरच्या षटकापर्यंत येऊन मोठे फटके खेळणारे खेळाडू आहेत. हार्दिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो तर राहुल तेवतियाकडे फिनिशर म्हणून भूमिका दिली आहे. गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल देखील शानदार फॉर्ममध्ये असून गेल्या दोन सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली आहे. दिल्लीविरुद्ध ८४ तर पंजाबविरुद्ध ९६ धावांची खेळी केली होती. ३ सामन्यात ६०च्या सरासरीने त्याने १८० धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन हे गुजरातची मोठी ताकद आहेत. जोडीला फिरकीपटू राशिद खान सारखा धोकादायक खेळाडू आहेच.

सनरायझर्स हैदराबादचा विचार केल्यास चेन्नईविरुद्धच्या विजयाने त्यांची गाडी रुळावर आली आहे असे म्हणता येईल. केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबादने चेन्नईचा ८ विकेटनी पराभव केला होता. पहिल्या दोन लढतीत पराभव झाल्यानंतर त्यांनी चॅम्पियन संघाविरुद्ध जोरदार कमबॅक केले. चेन्नईविरुद्ध अभिषेकने ७५ धावा तर केनने ३२ धावा केल्या होत्या. राहुल त्रिपाठीने फक्त १५ चेंडूत नाबाद ३९ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले होते. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, मार्को येन्सन आणि टी नटराजन यांच्यावर सर्व मदार असेल. फिरकीमध्ये वॉशिंग्टन सुंदर मोठी भूमिका पार पाडू शकतो.

Advertisement