अपघात: अष्टविनायक यात्रेस जाणारी खासगी बस पलटी, पुणे-नगर महामार्गावर दूर्घटना; 5 जखमी, जीवितहानी टळली


पुणे30 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे नगर मार्गावर आज पहाटे खासगी बस पलटी झाली. लोणीकंद येथे झालेल्या या अपघातात जीवितहानी नसून काही प्रवाशी जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

अष्टविनायक यात्रेसाठी ही बस जात हाेती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

नक्की काय झाले?

Advertisement

पुणे- नगर महामार्गावर लोणीकंद येथील पुलगाव गावाजवळ एका खासगी बसचा सकाळी सातच्या सुमारास अपघात झाला.

अष्टविनायक यात्रेसाठी ही बस निघाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या अपघातात 4 ते 5 प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

चालकाचे सुटले नियंत्रण

वाघोलीच्या पुढे असणाऱ्या लोणीकंद येथील पुलगावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पलटी झालेली बस सरळ करण्यासाठी क्रेन दाखल झाले असून पुढील कारवाई पोलिस करत आहेत.

Advertisement

पुणे नगर महामार्गावर अपघातांची संख्या वाढत आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बहुतांश अपघात झालेले दिसतात. वाहनाच्या वेगामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असून याकरता तातडीने उपाय करणे गरजेचे आहे.Source link

Advertisement