मयूर मेहता | नगर15 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
- मनपाला आठ महिन्यांपासून चालक मिळेना
- } कमी क्षमतेच्या मशीनमुळे
घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत तसेच इतर कामांसाठी महापालिका प्रशासनाने ६६ लाख रुपये खर्चून दोन पोकलेन मशीन खरेदी केले. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून चालक मिळत नसल्याचे कारण देत हे दोनही पोकलेन गॅरेजमध्ये उभे आहेत.
मनपाला कामासाठी २१० एचपी क्षमतेचे पोकलेन लागतात. प्रत्यक्षात मात्र ७० एचपी क्षमतेचे पोकलेन खरेदी केल्याने मनपाला पुन्हा खासगी ठेकेदाराकडून मशीन घेण्याची वेळ आली आहे.
राज्य सरकारने महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रकल्प व वाहन, साहित्य, यंत्र खरेदीसाठी सुमारे २८ कोटी रुपयांचे निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून मनपा प्रशासनाने सुमारे आठ महिन्यांपूर्वी ७० एचपी क्षमतेचे दोन पोकलेन मशीन खरेदी केले.
मात्र, गेली आठ महिने ड्रायव्हर मिळत नसल्याने ते गॅरेजमध्ये उभे आहेत. काही दिवसांपूर्वी महासभेत नगरसेवक श्याम नळकांडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत सदर मशीनचे ऑईल लीकेज झाले आहे, बॅटरी खराब झाली असल्याचे निदर्शनास आणून मनपाचे नुकसान होत असल्याचा दावा केला. मनपा अधिकाऱ्यांनी सदरचे पोकलेन मशीन ७० एचपीचे असून, आपल्याला २१० एचपीचे लागतात. नालेसफाईसाठी सदर कमी क्षमतेचे मशीन उपयोगी नाही.
त्यामुळे मनपाने खासगी ठेकेदारामार्फत भाडेतत्त्वावर मशीन घेतल्याचे सांगितले. जर ७० एचपी क्षमतेचे मशीन उपयोगी नव्हते, तर त्याची खरेदी का झाली, असा सवाल उपस्थित होत आहे. कमी क्षमतेचे मशीन घेतल्याने मनपाचा लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे.
महानगरपालिकेने खरेदी केलेले दोन पोकलेन आठ महिन्यांपासून गॅरेजमध्येच उभे आहेत. नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी सत्तर लाख रुपये खर्चून आठ महिन्यांपूर्वी खरेदी केलेले पोकलेन मशिन आजही गॅरेज मध्येच आहेत. त्याचा वापर होत नसल्याने त्याला गंज लागण्यास सुरुवात झाली आहे.
उपायुक्त यशवंत डांगे यांनी महासभेत आश्वासन देऊनही अद्याप या मशीनचा वापर सुरू झालेला नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून त्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नगरसेवक श्याम नळकांडे यांनी केली आहे.
जेसीबी व इतर वाहनेही कमी क्षमतेची?
महापालिका प्रशासनाने शासनाच्या निधीतून पोकलेन मशीनसह जेसीबी खरेदी केले आहेत. मात्र, त्याची क्षमताही कमी असल्याने त्याचा फारसा वापर होत नसल्याचे समोर येत आहे. नुकतीच कॉम्पॅक्टर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. सदर कॉम्पॅक्टरही कमी क्षमतेचे असल्याचे सांगितले जात आहे. कमी क्षमतेच्या मशीन घेतल्याने महापालिकेला पुन्हा भाडेतत्त्वावर मशीन घेऊन लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे.
नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी सत्तर लाख रुपये खर्चून आठ महिन्यांपूर्वी खरेदी केलेले पोकलेन मशिन आजही गॅरेज मध्येच आहेत. त्याचा वापर होत नसल्याने त्याला गंज लागण्यास सुरुवात झाली आहे. उपायुक्त यशवंत डांगे यांनी महासभेत आश्वासन देऊनही अद्याप या मशीनचा वापर सुरू झालेला नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून त्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नगरसेवक श्याम नळकांडे यांनी केली आहे.
जेसीबी व इतर वाहनेही कमी क्षमतेची? महापालिका प्रशासनाने शासनाच्या निधीतून पोकलेन मशीनसह जेसीबी खरेदी केले आहेत. मात्र, त्याची क्षमताही कमी असल्याने त्याचा फारसा वापर होत नसल्याचे समोर येत आहे. नुकतीच कॉम्पॅक्टर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. सदर कॉम्पॅक्टरही कमी क्षमतेचे असल्याचे सांगितले जात आहे. कमी क्षमतेच्या मशीन घेतल्याने महापालिकेला पुन्हा भाडेतत्त्वावर मशीन घेऊन लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे.