अनपेक्षित: ढगाळ वातावरण, तर कधी ऊन; ओसरला थंडीचा जोर, बदलत्या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांना फटका


Advertisement

परभणी4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नांदेड : शहरासह परिसरात रविवारी पहाटे पाचच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली.

Advertisement

मराठवाड्यात मागील काही दिवसांत वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत आहे. अनेक भागांत दिवसभरात कधी ढगाळ वातावरण, तर कधी ऊन असे वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरला असून मराठवाड्यात अनेक ठिकाणी खाली घसरलेल्या तापमानात वाढ होत आहे. दरम्यान, हवामानतज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी पहाटेच्या सुमारास नांदेड, परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. तसेच याआधी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद परिसरात गारपीटही झाली होती.

मराठवाड्यात खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. आता रब्बी हंगामातही बदलत्या वातावरणाचा फटका पिकांना बसतोय. ऐन हिवाळ्यात बदलत्या वातावरणामुळे उकाडा आणि पाऊस यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रब्बीतील वाढीच्या अवस्थेत असलेल्या हरभरा, कापूस, ज्वारीसह आदी पिकांना आणि फळबागांनाही बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. या ऐन हिवाळ्यातील पाऊस अन् उन्हाच्या खेळामुळे शेतकरी वर्ग मात्र चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगामापाठोपाठ बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामही आताचा जातो की काय अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

Advertisement

आठवडाभर ढगाळ वातावरण
पुढील सुमारे आठवडाभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. १० जानेवारी रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० किलोमिटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. – डॉ. के. के. डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण का?
सध्या वेस्टर्न डिस्टर्बस आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन तसेच वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. यामुळे तापमानात थोडी वाढ होत आहे, तर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Advertisement

बदलत्या वातावरणाचा पिकांना फटका बसू शकतो?
ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांना आणि फळबागांनाही फटका बसू शकतो. यात ज्वारी, गहू, हरभरा, करडी, सूर्यफूल आदी पिकांवर किडीचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तर फळबागांवरही रोगाचा प्रादुर्भाव होऊन फळांची गुणवत्ता कमी होऊ शकते.

या बदलत्या वातावरणाचा थंडीवर काय परिणाम?
ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी जाणवत आहे. तसेच किमान तापमानात फारशी घट ढगाळ वातावरणामुळे होत नाही. त्यामुळे तापमान जास्त घसरत नाही. हे ढगाळ वातावरण सुमारे पुढे आठवडाभर राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात जास्त घट होणार नाही. मात्र त्यानंतर वातावरण स्वच्छ झाल्यास थंडीचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement