अनंत चतुर्दशीसाठी सूचना: पुण्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व दुकाने बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार – अजित पवार


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Maharashtra Pune : All Shops In Pune Will Be Closed On The Day Of Ganesh Visarjan, Only Essential Services Will Continue; Information Of Ajit Pawar

Advertisement

पुणे17 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरूच राहतील

कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील निर्बंध अधिक कडक केले जाणार आहे. पोलिसांकडून उत्सवासाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

Advertisement

दुकाने बंद राहणार
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, विसर्जनाच्या दिवशी दुकाने बंद राहणार आहे. मात्र असे असले तरी हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरूच राहतील. सध्या कोरोना हा नियंत्रणात आहे. मात्र, गणेशोत्सवानंतर काय होईल याविषयी सांगता येत नाही. परिस्थिती नियंत्रणात राहिली, तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत हे निर्बंध असेच राहतील. परिस्थिती सुधारली तर 2 ऑक्टोबरपासून पुण्यातील निर्बंधांविषयी पुढील निर्णय घेतला जाईल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

यासोबतच रस्ते, पदपथांवर मूर्ती विक्री स्टॉल लावू नयेत, यासोबतच प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना यावेळी देखील परवानगी दिली जाणार नाही, अशी नियमावली पोलिसांनी तयार केली आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement