पुणे40 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
“अधिवेशन संपल्यावर टोलमाफी करू” असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. जुन्या पुणे मुंबई महरामार्गावरील तळेगाव दाभाडे जवळील टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा याकरता जनसेवा विकास समितीचे संस्थापक उद्याेजक किशाेर आवरे यांच्यासह सात कार्यकर्ते मागील चार दिवसांपासून आमरण उपाेषण करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी साेमटणे टाेलनाका येथे मंगळवारी जाहीर आंदाेलन केले. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी आंदाेलनात सहभाग हाेऊन शासनाची भूमिका मांडली आहे.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह माेठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित हाेते.
काय म्हणाले रविंद्र चव्हाण?
मंत्री चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सत्तेत आल्यापासून सर्वसामान्य लाेकांना भेडसावणारे प्रश्न साेडवत आहे. त्यांचा निराेप घेऊन मला त्यांनी पाठवले आहे. विचार विनिमय करुन चर्चा करत मार्ग काढला जाऊ शकताे. लाेकशाही मार्गाने एकत्रित येत न्याय मागण्यासाठी आंदाेलन करण्यात येते. सरकार पर्यंत लाेकांच्या भावना पाेहचलेल्या आहे. आंदाेलन मागे घेण्यात यावे, आपल्याला जे अपेक्षित आहे. अधिवेशन संपल्यावर एकत्रित बैठक मुंबईला घेऊन ही समस्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. जाेपर्यंत ही बैठक हाेत नाही ताेपर्यंत टाेलनाक्यावर स्थानिकांचा टाेल माफ करण्यात येईल. अंतिम टाेल माफीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील.
टोल होणार होता बंद
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, पाेलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असली तरी आम्ही साेमटणे टाेलनाका काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर हा टाेल असून याची मालकी राज्य सरकारकडे सध्या आहे. आयआरबी कंपनीकडे टाेलनाक्याची वसूल असून सन 2019 मध्ये हा टाेल बंद हाेणार हाेता.
साेमटणे टाेलनाका हा कायदेशीर नसल्याचे राज्याचे रस्ते विकास महामंडळ सांगत आहे तसेच लेखी माहिती त्यांनी दिली. त्यानंतरही टाेल वसुली केली जात असल्याने नागरिकांवर अन्याय हाेत आहे. जाेपर्यंत टाेलनाका बंद हाेण्याचा निर्णय हाेत नाही ताेपर्यंत नागरिक टाेलनाकावर टाेल भरणार नाही, असेही ते म्हणाले.
टोल लावणे चुकीचे
पूर्वीचे व सध्याचे सरकार मध्ये काय निर्णय झाले याबाबत आम्हाला माहिती नाही परंतु द्रुतगती महामार्गावर जाणाऱ्या लाेकांसाठीचा टाेल जुन्या महामार्गावर लावणे चुकीचे आहे. दैनंदिन कामगार, शेतकरी, व्यवसायिक यांना टाेलवर अडवणूक केली जाते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी देखील या घटनेची दखल घेतलेली आहे.