नगर28 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे २१ वे द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन रविवारी (२१ मे) नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे भाजीपाला बाजार आवारात होणार आहे.
या वेळी कष्टकरी हमाल मापाडी कामगारांचे लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते साडेदहा वाजता हाेणार आहे.
कुठे होणार अधिवेशन?
अहमदनगरच्या मार्केड यार्ड येथील अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्या प्रांगणात स्व. शंकरराव घुले यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा साकारला आहे. बँकहमाल पंचायतीने एक रुपयात कष्टाची झुणका भाकर, दवाखाना, हमालांची पतपेढी, स्वस्त कापड दुकान, रिक्षा पंचायत आदी उपक्रम शंकरराव घुले यांनी सुरू केले.
आज हमाल मापाडी महामंडळ अधिवेशन
रविवारी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे द्वैवार्षिक राज्यव्यापी अधिवेशन मार्केड यार्ड येथे हाेणार आहे. या अनावरण साेहळ्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, आमदार धनंजय मुंडे, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार शिवाजी कर्डिले, पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित राहणार आहेत. कष्टकरी हमाल-मापाडी कामगारांचे लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या कार्यकाळात एकदा नगरला हे अधिवेशन घेण्यात आले होते. आता पुन्हा हे अधिवेशन होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबा आढाव असतील, तसेच माजी समाजकल्याण मंत्री व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार, माजी आ. दादा कळमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिवेशन स्वागत समितीचे अध्यक्ष संग्राम जगताप यांनी दिली.
३३ वर्षांनी नगरला अधिवेशन
नगरला ३३ वर्षांनी अधिवेशन होतेय हमाल-मापाडी महामंडळाचे अधिवेशन दर तीन वर्षांनी घेण्यात येते. नगरमध्ये लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या कार्यकाळात १९९० मध्ये नगरला असे अधिवेशन झाले होते. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी पुन्हा एकदा नगरला हे अधिवेशन होत असल्याचे अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी सांगितले.
अधिवेशनात मांडणार ‘या’ मागण्या
राज्यात माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, हमाल मापाडींना पेन्शन योजना सुरू करावी, राज्यात कामगार खात्यात व माथाडी मंडळातील रिक्त जागा तातडीने भराव्यात आणि माथाडी मंडळाला त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार स्वतंत्र अध्यक्ष व सचिव नियुक्त करावा, आदी मागण्या या अधिवेशनाद्वारे सरकार दरबारी करण्यात येणार आहेत.
नगरला ३३ वर्षांनी अधिवेशन होतेय हमाल-मापाडी महामंडळाचे अधिवेशन दर तीन वर्षांनी घेण्यात येते. नगरमध्ये लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या कार्यकाळात १९९० मध्ये नगरला असे अधिवेशन झाले होते. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी पुन्हा एकदा नगरला हे अधिवेशन होत असल्याचे अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी सांगितले.