अधिक दराने खतांची विक्री: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 9 खत विक्रेत्यांवर परवाने निलंबनाची कृषी विभागाची कारवाई


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Action By Agriculture Department To Suspend Licenses Till February 16 Against 9 Fertilizer Sellers Who Cheated Farmers By Selling Fertilizers At Higher Rates In The District By Pretending Artificial Scarcity.

नाशिक11 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांसाठी मुबलक खते असतांनाही त्यांची कृत्रीम टंचाई भासवुन अधिक दराने विक्री करणाऱ्या 9 कृषी निविष्ठा केंद्रावर कृषी विभागाने कारवाई करुन त्यांचे परवाने 16 फेब्रुवारीपर्यंत निलंबीत करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कृत्रीम टंचाईच्या नावाखाली फसवणुक केल्याचे कृषी विभागाच्या कारवाईवरुन उघडकीस आले आहे.

Advertisement

नाशिक जिल्ह्यातील चांदवड, देवळा, कळवण तालुक्यातील कृषी निविष्ठा केंद्रचालकांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या खतांची कृत्रीम टंचाई निर्माण केली होती. खते असुनही शेतकऱ्यांना दिली जात नव्हती. ज्या शेतकऱ्यांनी खते हवे आहे, त्यांच्याकडुन अधिक दर वसुल केले जात होते. याची कुणकुण जिल्हा कृषी विभागाला लागली होती. त्यानुसार गत आठवड्यात कृषी अधिकाऱ्यांनी वेषांतर करुन कृषी निविष्ठा केंद्रावर छापा टाकला.

यामध्ये 9 केंद्रावर अधिक दराने खते विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. या दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली.जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे यांच्या समोर तपासणी झाली असता, सोनवणे यांनी संबधीत दुकानदारांचे 16 फेब्रुवारीपर्यंत परवाने निलंबीत करण्याची कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे,मोहीम अधिकारी अभिजीत जमधडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक अभिजीत घुमरे,विलास सोनवणे, मिनल म्हस्के, राहुल आहेर, किरण शिंदे, नलिनी खैरनार हे उपस्थित होते.

Advertisement

या खत विक्रेत्यांवर केली कारवाई

एकविरा फर्टीलायझर लोहणेर ता.देवळा, जैन फर्टीलायझर लोहणेर, देवळा, न्यू विजय कृषी सेवा केंद्र, लोहणेर ता.देवळा, .गुरुदत्त कृषी सेवा केंद्र कळवण, विशाल कृषी मंदिर कळवण, सुनील बेबीलाल संचेती कळवण, सुयश ट्रेडिंग कंपनी, कळवण, सोनाई कृषी सेवा केंद्र, दुगाव ता.चांदवड, स्वामी समर्थ कृषी सेवा लोहणेर ता.देवळा

Advertisement

जिल्हा अधीक्षक कृषी विवेक सोनवणे म्हणाले की, खत विक्रेते यांनी केंद्राच्या दर्शनी भागात खत साठ्याची तसेच दराची माहिती लावावी. खतांचे लिंकिंग आणि ज्यादा दराने विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच शेतकऱ्यांना खतांचे पक्के बिल देण्यात यावे.अनुदानित खतांची विक्री ही ईपाँज मशीन द्वारेच करावी. अन्यथा कारवाई ला सामोरे जावे लागेल.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement