‘अद्भुत, अविश्वसनीय आणि अकल्पनीय असा फिट महेंद्रसिंग धोनी’, तो पुढचा सीजन खेळणार यावर शास्त्रींची प्रतिक्रिया

‘अद्भुत, अविश्वसनीय आणि अकल्पनीय असा फिट महेंद्रसिंग धोनी’, तो पुढचा सीजन खेळणार यावर शास्त्रींची प्रतिक्रिया
‘अद्भुत, अविश्वसनीय आणि अकल्पनीय असा फिट महेंद्रसिंग धोनी’, तो पुढचा सीजन खेळणार यावर शास्त्रींची प्रतिक्रिया

राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल २०२२मधील ६८व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला ५ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. हा सीएसकेचा हंगामातील शेवटचा सामना होता. या सामन्यापूर्वी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने आपल्या पुढील हंगामातील उपलब्धतेबद्दल चाहत्यांना खुशखबरी दिली. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. धोनी क्रिकेटचा पूर्णपणे आनंद लुटत आहे आणि तो अश्विसनीय रूपाने फिट व्यक्ती आहे, असे शास्त्रींचे म्हणणे आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू शास्त्री क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले की, “हे बरे झाले की, धोनीने पुढील वर्षी खेळण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे त्याच्या अनुपलब्धतेच्या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. तो देशाचा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा लिडर राहिला आहे. धोनीने पुढील हंगामातही खेळण्याची केलेली घोषणा, यापेक्षा सीएसकेच्या चाहत्यांसाठी दुसरी कोणतीही मोठी गोष्ट नाही.”

Advertisement

“तो निश्चितपणे गतवर्षीच्या तुलनेत अजून चांगला खेळत आहे. आयपीएल २०२२मध्ये त्याचे वैयक्तिक प्रदर्शन गतवर्षीपेक्षा खूप चांगले राहिले आहे. तो चेंडूला सरळ मारत होता. त्याने त्याची लय परत मिळवली आहे. तो अविश्वसनीय रूपाने फिट व्यक्ती आहे,” असेही त्यांनी म्हटले. काय म्हणाला होता धोनी? राजस्थानविरुद्धच्या सामन्यावेळी नाणेफेकीसाठी गेला असताना धोनीने आपण पुढील आयपीएल हंगाम खेळणार की नाही?, याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. “नक्कीच, यामागे एक साधेसोपे कारण आहे. जर मी चेन्नईत न खेळताच आयपीएलमधून निवृत्ती घेतली, तर हा चेन्नई आणि चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीवर एकप्रकारे अन्यायच असेल,”

“आशा आहे की, ही एक संधी असेल जिथे संघ प्रवास करतील आणि म्हणून मी सर्व ठिकाणांना धन्यवाद म्हणू शकेल. हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम असेल की नसेल, हा खूप मोठा प्रश्न असेल. कारण आपण वास्तवात २ वर्षांबाबतची भविष्यवाणी नाही करू शकत. परंतु निश्चितपणे मी पुढील वर्षी आयपीएलमधून मजबूत पुनरागमन करण्यासाठी भरपूर मेहनत घेईल,” असेही धोनीने म्हटले होते.

Advertisement