पुणे3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे राज्यभरात प्रचंड नुकसान झाले आहे.याबाबत झालेल्या नुकसानीवर विरोधकांकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जोरदार आवाज उठविला जात आहे.याबाबत पत्रकारांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी म्हणाले, शेतकऱ्यांनी नुसता फोटो काढला तरी आमचे सरकार पैसे देते. मात्र विरोधकाचे तसे नाही मात्र याबाबतीत विरोधकांचे आश्चर्य वाटत आहे.
त्यांच्या काळातील नुकसानीचे पैसे आम्ही देत आहे.रात्रीच्या वेळी पडलेल्या पावसाचा सकाळी पंचनामा त्यांनी तरी बघितले आहे का? मात्र तसे नुकसान झाले तर त्याचेही आम्ही पैसे देतो आहे. त्यामुळे आतिवृष्टी सारख्या इव्हेंटचे राजकारण कोणी करू नये असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या विरोधातील नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. तर आज दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर घरावर दुसऱ्यांदा ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या कारवाईविषयी मला जास्त काही माहिती नाही वेगवेगळ्या माध्यमांतील बातम्यामधूनच ही गोष्ट कळाली आहे. त्यामुळे त्याविषयी त्यांनी अधिकचे मत काही माझ्यकडून नोंदवले जाणार नाही.
पोटनिवडणूक पराभवाचे आत्मचिंतन पूर्ण
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी प्रथमच पुणे दौरावरआले. या दौऱ्यावेळी त्यांनी झालेल्या पोटनिवडणुकी विषयी भाजपची पुढील रणनिती बाबत सांगितले की, या निवडणुकीत पराभव झाला असला तरी मतदारांचा कौल आम्ही मान्य केला आहे. आगामी काळातील निवडणुकीबाबत या निकालाचा आम्हाला विचार करता येईल. एखादी निवडणूक जिंकतो हरतो मात्र या निकालामुळे फार काही फरक पडत नाही.त्याचे मुल्यमापन करतो दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर त्याचे आत्मचिंतन, पोस्टमार्टम करतो आणि ते आम्ही केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याची योग्य काळजी घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.