पंजाब किंग्जनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेतील त्यांचा हा सलग पाचवा पराभव ठरला. पंजाब किंग्जने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १९८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर स्वस्तात माघारी फिरले. रोहित शर्मा आणि ईशान किशन बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि डेवॉन ब्रेविस या जोडीनं डाव सावरला. पण ही दोघ बाद झाल्यानंतर पुन्हा सामन्याला कलाटणी मिळाली. सुर्यकुमार मैदानात होता तोवर सामना मुंबईच्या हातात होता. सुर्यकुमारची विकेट पडली आणि सामन्यावर पंजाब किंग्जने पकड मिळवली. तिलक वर्मा आणि पोलार्ड या दोघांच्या रन आउटच्या विकेट्समुळे मुंबई इंडियन्सची विजयाची संधी हुकली. जर या दोन विकेट्स गेल्या नसत्या तर सामन्याचा निकाल निश्चितच वेगळा असता. ३२ चेंडूत ५२ धावा मयांक अग्रवालने करत त्याने एक सन्मानजनक धावसंख्या पर्यंत पंजाब किंग्सला पोहचवले त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २३ व्या सामन्याला सुरुवात झाली आहे. आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये खेळवला जात असून मुंबई इंडियन्स आपल्या पहिल्या विजयासाठी पूर्ण ताकतीने मैदानात उतरला आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईसमोर सध्या १९९ धावांचे लक्ष्य आहे. सुर्यकुमार यादवच्या खेळीला ब्रेक, रबाडाच्या गोलंदाजीवर तो ४३ धावांवर झेलबाद झाला. पोलार्डनंही धावबादच्या रुपात फेकली विकेट, त्याने १० धावांची खेळी केली. तिलक वर्मानंतर मुंबईने दुसरी विकेट धावबाद स्वरुपात गमावली. ओडियन स्मिथनं मुंबई इंडियन्सची सेट झालेली जोडी फोडून सामना पुन्हा पंजाबच्या बाजूनं वळवला. तिलक वर्मा आणि डेवॉन ब्रेविस या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ब्रेविसचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकल. त्याने २५ चेंडूत ४९ धावांची दमदार खेळी केली.
पंजाबच्या फलंदाजांनी धुलाई करत मुंबईच्या संघाला १९९ धावांचे मोठे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने चांगली सुरूवात केली होती पण तो लवकर बाद झाला. पण बेबी एबीने पंजाबच्या गोलंदाजांना दणका दिला. मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलेला राहुल चहर पंजाबकडून गोलंदाजीसाठी आला. त्याच्या षटकाचा बेबी एबीने चांगलाच समाचार घेतला. पहिल्या चेंडूवर तिलक वर्माने एक धाव काढली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बेबी एबीने चौकार मारला. पण तो तिथेच थांबला नाही. त्यापुढील चारही चेडूंवर त्याने चार षटकार लगावले. त्यामुळे राहुल चहरची एक ओव्हर पंजाबला तब्बल २९ धावांना पडली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५० चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. तसेच, कर्णधार मयंक अगरवालने कर्णधारपदाला साजेशी अशी अर्धशतकी खेळी केली. त्याने ३२ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकार मारत ५२ धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक जितेश शर्माने ३० धावांचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाने २० धावांचा आकडा पार केला नाही.