अजित पारसेचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर: पोलिस अटक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष, डाॅक्टरसह अनेकांना गंडवल्याचे प्रकरण


नागपूरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्याच्या बहाण्याने होमिओपॅथी डॉक्टरला साडेचार कोटींनी गंडा घालण्यासह मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने अनेकांना सुमारे 20 ते 25 कोटींनी चूना लावणारा कथित सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसेचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

Advertisement

सरकारी पक्षाची बाजू ग्राह्य

जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. 11 जि. पी.देशमुख यांनी आरोपी विरुध्द प्रत्यक्ष सहभाग आणि रक्कमे बाबत देवाण घेवाण दिसत असल्यामुळे पारसेचा जामीन अर्ज खारीज व्हावा ही सरकार पक्षाची बाजू ग्राह्य धरुन आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू ॲड अभय जिकार यांनी मांडली. तर आरोपीतर्फे ॲड कमल सतुजा यांनी युक्तीवाद केला.

Advertisement

गुन्ह्यातील फिर्यादी डॅाक्टर राजेश मुरकुटे यांना मेडीकल कॅालेजची परवानगी प्राप्त करुन देतो, त्याच प्रमाणे सिबीआयकडून चौकशी सुरु असल्याचे बनावट सुचनापत्र तसेच बँकेची बनावट कागदपत्रे व्हाॅटसअ‌ॅपवर टाकून विश्वास संपादन करुन वेळोवेळी 4,36,50,000 रुपयांची फसवणूक केली. तक्रारीवरुन संशयित आरोपी अजित पारसेविरुध्द कलम 84, 420, 465, 467, 468, 471 भा.द.वि नुसार पोलीस स्टेशन कोतवाली येथे गुन्हा दाखल झाला आणि सदर प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले.

सापडली होती राजमुद्रा, बनावट शिक्के

Advertisement

अजित पारसे यांच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली असता राजमुद्रा असलेले शिक्के, पोलीस, बॅक, पोलीस स्टेशन, आयकर विभागाचे शिक्के, तसेच शासकीय कार्यालयाचे बनावट सिल व शिक्के व सापडले होते.

सीपी अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार

Advertisement

पारसेची न थांबणारी मागणी पुरवता येणे शक्य नसल्याने होमिओपॅथी डाॅक्टरने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केल्याने सोशल मीडिया विश्लेषकाच्या आड असलेला लुटारू चेहरा समोर आला होता.

CSR अंतर्गत निधीचेही आमिष दाखवले

Advertisement

याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये सोशल मीडिया विश्लेषक व सायबर तज्ज्ञ अजित गुणवंत पारसे (वय 42 भेंडे ले-आऊट) यांच्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 मध्ये होमीओपॅथी डाॅक्टर असलेल्या राजेश मुरकुटे यांची नातेवाईकाच्या माध्यमातून पारसेंसोबत ओळख झाली. होमिओपॅथी कॉलेज सुरू करायचे असल्याचे डॉक्टरने पारसेला सांगितले. पंतप्रधान कार्यालयात ओळख असून, कॉलेज सुरू करण्यासाठी तुम्हाला ट्रस्ट स्थापन करावा लागेल, असे पारसेने सांगितले. त्यानंतर त्यांनी ट्रस्टसाठी चार नावे सूचवली. यापैकी एक नाव नीती आयोगातर्फे आपल्याला मिळू शकते. तसेच सीएसआरअंतर्गत निधीही मिळूवन देण्याचे आमिष त्याने डॉक्टरला दाखविले होते. अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्याने आतातरी पोलिस त्याला अटक करतातका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement