अजित पवार कायम उपमुख्यमंत्री बनण्यासाठी तयार असतात: मला त्यांची दया येते; माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा खोचक टोला

अजित पवार कायम उपमुख्यमंत्री बनण्यासाठी तयार असतात: मला त्यांची दया येते; माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा खोचक टोला


मुंबई17 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला हाणला आहे. अजित पवार एक वेगळे व्यक्तिमत्व आहे. ते कायम उपमुख्यमंत्री बनण्यासाठी तयार असतात. यामुळे मला कधी कधी त्यांची दया येते, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवरील त्यांच्या वर्चस्वाचे कौतुकही केले.

Advertisement

शरद पवारांचे मोठेपण कायम

भगतसिंह कोश्यारी यांनी एका हिंदी न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार, अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घटनाक्रमावर भाष्य केले. ते म्हणाले की, देशातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती शरद पवार यांचा आदर करते, एवढे ते मोठे आहेत. आम्ही राजकीय मुद्यांवर एकमेकांवर टीका करत असलो तरी, शरद पवार यांच्याविषयी माझ्या मनात नेहमीच आदरभाव राहिला आहे.

Advertisement

शरद पवार यांचा दोनवेळा डिलीट पदवी देऊन सत्कार करण्याचा मान मला मिळाला, अशी आठवणही कोश्यारी यांनी यावेळी काढली.

पहाटेच्या शपथविधीची आठवण

Advertisement

भगतसिंह कोश्यारी यांना यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी संबंधी प्रश्न केला असता त्यांनी अजित पवारांना खोचक टोला हाणला. मला अजित पवारांची दया येते, असे ते म्हणाले.

अजित पवारांना खोचक टोला

Advertisement

अजित पवार महाराष्ट्रातील एक हुशार राजकारणी आहेत. आपल्या राज्यातही असाच एक मोठा नेता आहे, तो कितीही वेळा पराभूत झाला तरी हार मानत नाही. त्यानुसार अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यासाठी सांगितले तरी ते त्यासाठी कायम तयार असतात. कधी कधी मला त्यांची दया येते, असे भगतसिंह कोश्यारी उपरोधिकपणे हसत म्हणाले.

यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुकही केले. अजित पवार एक छान व हुशार माणूस. त्याचा मास बेस मोठा आहे. संघटनेवर मोठी पकड आहे. बहुतांश आमदार-खासदार त्यांच्याच बाजूने आहेत. अजित यांचे संघटन कौशल्य, नेतृत्व व पक्षातील स्थान मोठे आहे, असे ते म्हणाले.

Advertisement



Source link

Advertisement