अजित पवारांबद्दल कोश्यारी पहिल्यांदा खरे बोलले: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका

अजित पवारांबद्दल कोश्यारी पहिल्यांदा खरे बोलले: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका


नागपूर44 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अजित पवार महाराष्ट्रात स्थिरस्थावर झालेले राजकारणी आहेत. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी कितीही वेळा सांगितले तरी ते कितीही वेळा होण्यास तयार आहेत. मला कधीकधी त्यांची दया देखील येते, असे वक्तव्य माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका मुलाखतीत केले. त्यावर बोलताना राज्याचे विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी हे पहिल्यांदा सत्य बोलले, हे मी मान्य करतो असे सांगत दादांना टोला हाणला. ते येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Advertisement

शनिवारच्या सभेत अजित पवार यांनी खरे सांगितले. ते सत्तेसाठी नाही तर ईडीमुळे म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमुळे गेले असावे असे ते म्हणाले. मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो असतो, याचा अर्थ मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी गेले हेही समजू शकतो. त्यासाठी नाही तर मग कशासाठी केले हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे, असे ते म्हणाले.

बीडमध्ये अजित पवारांची उत्तर सभा आयोजित केली आहे. आपापसातील स्पर्धेतून सभा आणि उत्तर सभा सुरू आहे. याचा अर्थ, राष्ट्रवादी शंभर टक्के फुटलेली आहे, असा होतो. नऊ आमदार फुटल्यामुळे राष्ट्रवादी फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदीचे गुणगान करण्याचा दृष्टांत दहा वर्षांपूर्वी का झाला नाही. आत्ताच का झाला ते त्यांचे त्यांनाच माहित अशी टीका केली. मुंबई गोवा रस्ता खराब झाला हे खरे आहे. या रस्त्यासाठी यापूर्वी आंदोलन होण्याची गरज होती. समृद्धीपेक्षा हा रस्ता जास्त महत्वाचा आहे. अनेक जण कोकणात जातात. हा रस्ता जीवघेणा आहे. म्हणूनच मनसे आंदोलन करीत असेल. त्यामुळे नक्कीच रस्ता दुरुस्त होईल असे वडेट्टीवार म्हणाले.

AdvertisementSource link

Advertisement