अजित दादांनी टोचले शिक्षकांचे कान!: म्हणाले- सकाळी 6 वाजेपासून मरमर करतो…तरी बारामतीचा निकाल शून्यच; आता का कपाळ फोडावं?

अजित दादांनी टोचले शिक्षकांचे कान!: म्हणाले- सकाळी 6 वाजेपासून मरमर करतो…तरी बारामतीचा निकाल शून्यच; आता का कपाळ फोडावं?


मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील शिक्षकांचे चांगलेच कान टोचले आहेत. शिष्यवृत्तीच्या परिक्षेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शून्य टक्के लागल्यामुळे त्यांनी आज संतप्त प्रतिक्रिया दिली. तर शिक्षकांचे चांगलेच कान टोचले. त्यांच्या खुमासदार शैलीत त्यांनी आज मी काय डोकं फोडून घेऊन का, एवढी मरमर करतो, तरी देखील बारामतीतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीतील निकाल शून्य लादल्याने शिक्षकांचे कान टोचले आहेत.

Advertisement

शिक्षक पुरस्कार सोहळ्यात कानउघाडणी

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही येथे जिल्ह्यासाठी व राज्यासाठी मरमर काम करतो. आता काय कपाळ फोडून घेऊ का? एवढं सगळं करुनही बारामतीचा निकाल शून्यच आहे. आज अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्यांनी शिक्षकांची कानउघाडणीच केली.

Advertisement

काही शाळांचा निकाल चांगला पण..
अजित पवार पुढे म्हणाले की, आपल्या मुलांना कुठे शिकवायचं हा प्रत्येक पालकाचा अधिकार आहे. त्यामुळे त्यात जाण्यात काही अर्थ नाही. आज गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी घडत आहेत. पहिलीपासून इंग्रजी सुरू झालं. या अगोदर पाचवीपासून होतं. कालानुरूप बदल केला जातो. बदल करण्याची प्रक्रिया सुरू असते. शिष्यवृत्तीमध्ये अनेक शाळाचा चांगला निकाल लागला आहे, तर काही शून्य लागला आहे. शिक्षण देण्यासाठी हवं ते दिलं जाईल. मात्र शिक्षण नीट द्या, अशा शब्दांत त्यांनी शिक्षकांना सल्ला दिला आहे. लातूर पॅटर्न शिक्षकांमुळे प्रसिद्ध असल्याचंही ते म्हणाले.

मग बारामतीचा निकाल शून्यच का?
पाचवीचा शिष्यवृत्तीचा निकाल लागला आहे. या परीक्षेत 640 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात शिरूरची मुले जास्त आहेत. त्यानंतर खेडची मुलं आहेत आणि त्यानंतर सातव्या क्रमांकावर बारामती आहे. पुरंदर तालुक्यातील एका मुलाने अब्रू राखली आहे. शिरुरच्या पोरांनी बाजी मारली आहे. मात्र बारामती, भोर आणि हवेलीचा निकाल शून्य टक्के आहे. आता काय कपाळ फोडून घेऊ का? आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून मरमर काम करतो आणि बारामतीचा निकाल शून्य, असं म्हणत ते शिक्षकांवरच भडकले.

Advertisement



Source link

Advertisement