अजब ‘समाजकल्याण’: साहित्य खरेदीत 2.17 कोटीचा अपहार; दुपटीहून अधिक दराने खरेदी; निवासी शाळेवर ‘नाविन्यपूर्ण’ खर्च


विठ्ठल सुतार | सोलापूर42 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सहायक समाजकल्याण कार्यालयाकडील अक्कलकोट व नजीक पिंपरी येथील निवासी शाळा डिजिटल करण्यासाठी ४ कोटी ५५ लाख रुपये खर्च केले आहे. या कामांसाठी खरेदी केलेल्या वस्तूंच्या किमती व प्रत्यक्ष बाजारात उपलब्ध असलेल्या किमतींची तुलना केली असताना दर दुपटीहून अधिक लावल्याने दोन्ही योजनांमध्ये साडेचार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आरटीआय कार्यकर्ते प्रकाश नारायणकर यांनी घेतलेल्या माहितीतून दिसते. हा निधी २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षात नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून खर्च केला आहे.

Advertisement

निवासी शाळा डिजिटल करण्यासाठी २०२०-२१ मध्ये खरेदी करण्यात आली. यामध्ये ठेकेदाराने डिजिटल शाळा केल्यानंतर औरंगाबाद येथील स्टार इंटरप्रायजेसचे बील जोडले आहे. त्या बीलामध्ये वरील साहित्याची खरेदी केली असून जीएसटीसह ४ कोटी ५३ लाख ८० हजार रुपये दाखविले आहे. प्रत्यक्षात बाजारात या साहित्याची किंमत जीएसटीसह २ कोटी ३५ लाख ९२ हजार रुपये आहे. बाजारातील दर व ठेकेदारांनी दिलेले दर यामध्ये २ कोटी १७ लाख रुपयांची तफावत आहे.

खरेदीत २.१७ कोटीचा अपहार…

Advertisement

समाजकल्याण आयुक्तांना नाविन्यपूर्ण योजनेतून डिजिटल शाळा तयार करण्यासाठी ४ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. डिजिटल शाळा तयार करण्यासाठी जे साहित्य खरेदी केले आहे, त्याची बाजारातील किंमत २ कोटी १७ लाख रुपये आहे, पण ठेकेदारास ४ कोटी ५३ लाख रुपये अदा केले आहेत. यामध्ये २.१७ कोटीचा अपहार झाल्याचा संशय आहे. याची चौकशी करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. प्रकाश नारायणकर, तक्रारदार

मला माहिती नाही

Advertisement

साहित्य खरेदीचा विषय दोन वर्षापूर्वीचा असून आता माझी बदली झाली आहे. साहित्य खरेदी ऑनलाइन पद्धतीने केली आहे. तसेच त्याचे शासनाकडून लेखापरीक्षण झाले आहे. त्यात कोणताही आक्षेप, त्रुटी आढळल्या नाहीत. कुणी तक्रार केल्याची मला माहिती नाही. माझ्यापर्यंत तक्रारही आली नाही, यामुळे मला यावर काहीच बोलायचे नाही.’’ कैलास आढे, तत्कालीन सहायक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर ‎



Source link

Advertisement