अजब कारनामा: ज्योतिषाच्या सांगण्यावरून चोरट्यांनी मुहर्तावर केली 1 कोटीची घरफोडी; चोरीनंतर देवदर्शन करत दानधर्म

अजब कारनामा: ज्योतिषाच्या सांगण्यावरून चोरट्यांनी मुहर्तावर केली 1 कोटीची घरफोडी; चोरीनंतर देवदर्शन करत दानधर्म


पुणे6 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक
  • Giving charity after theft

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात देवकाते नगर याठिकाणी चार महिन्यांपूर्वी पाच दरोडेखोरांनी एका घरावर जबरी दरोडा टाकत महिलेचे हातपाय बांधून दरोडा घातला होता. चोरट्यांनी सोने चांदीच्या दगिन्यांसह तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्ह्यातील सर्व दरोडे खोरांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. पोलीस तपासात त्यांनी एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून ही चोरी केल्याचे कबूल केले आहे. यासाठी चोरट्यांनी मुहूर्त काढला होता आणि त्यानुसार मुहूर्तावर चोरी केल्याने सर्व आरोपी खुशीत होते. यातुनच त्यांनी बालाजी, शिर्डी येथे जात देवदर्शन घेत दानधर्म देखील केल्याचे तपासात उघड झाले आहे.

Advertisement

ही आहेत अटक करण्यात आलेल्यांची नावे

दुर्योधन ऊर्फ दिपक ऊर्फ पप्पु धनाजी जाधव (वय -३५, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. जिंती, हायस्कुलचे जवळ ता. फलटण, जि. सातारा),सचिन अशोक जगधने (वय- ३०, व्यवसाय नोकरी, रा. गुणवडी, २९ फाटा, जि.प.शाळेजवळ, ता. बारामती) रायबा तानाजी चव्हाण (वय- ३२, व्यवसाय चालक, रा. शेटफळ हवेली, जाधववस्ती, कॅनॉलजवळ, ता. इंदापूर), नितीन अर्जुन मोरे (वय- ३६, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. धर्मपुरी, ता. माळशीरस, जि सोलापूर), रविंद्र शिवाजी भोसले, (वय -२७, व्यवसाय नोकरी , शेतमजुरी, रा. निरा वागज, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर रामचंद्र वामन चव्हाण (वय -४३, व्यवसाय शेती, ज्योतीष, मुळ रा. आंदरूड ता. फलटण जि सातारा) असे ज्योतिषाचे नाव आहे. याबाबत, सागर शिवाजी गोफणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

Advertisement

ज्योतिषाच्या सांगण्यावरून टाकला दरोडा

पोलिस आयुक्त अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार ,बारामतीत २१ एप्रिलला भरवस्तीत ही घटना घडली होती. सागर गोफणे यांच्याकडे जमिनीच्या व्यवहारातून मोठी आर्थिक रक्कम आलेली होती. दरम्यान, गोफणे हे तिरूपति बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांची पत्नी ही घरी एकटी होती. वरील पाच दरोडेखोरांनी रामचंद्र चव्हाण या ज्योतिषाच्या सांगण्यावरुन गोफणे यांच्या घरी शिरून दरोडा टाकला. गोफणे यांची पत्नी ही घरी एकटीच होती. चोरट्यांनी त्यांचे हात पाय बांधून ९५ लाख ३० हजार रूपये रोख रक्कम व सुमारे २० तोळे वजनाचे ११ लाख ५९ हजार ३०० रूपये किंचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा असा एकूण एक कोटी ७ लाख २४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता.

AdvertisementSource link

Advertisement