मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १५८ धावा चोपल्या. राजस्थानच्या १५९ धावांचे आव्हान मुंबईने १९.२ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. यासोबच हंगामातील पहिला विजय आपल्या नावावर केला. मुंबईचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईचा डाव सावरत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी मुंबईचे १३ व्या षटकात मुंबईचे शतक धावफलकावर लावले. दरम्यान, सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने तिलक वर्मा सोबत तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली.
मात्र मुंबईच्या १२२ धावा झाल्या असताना युझवेंद्र चहलने सूर्यकुमारला ५१ तर प्रसिद्ध कृष्णाने तिलक वर्माला ३५ धावांवर बाद केले. यामुळे मुंबईचे टेन्सन वाढले. अखेर डेवाल्ड ब्राविसच्या जागी आलेल्या सिंगापूरच्या टीम डेव्हिडने १८ व्या षटकात आक्रमक फटकेबाजी करत सामना १२ चेंडूत १२ धावा असा आणला. पण पहिल्या ८ सामन्यात पराभवाचं पाणी चाखल्यानंतर आता मुंबई इंडियन्सने पहिला विजय साकारला आहे. शनिवारी नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला. मुंबईसाठी विजयी षटकार डॅनियल सॅम्सने मारला.
आयपीएलच्या ४४ व्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथ गोलंदाजी करण्याचा निर्णय घतेला. ऋतिक शोकीनने राजस्थानचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलला १५ धावांवर बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. त्यानंतर संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र ७ चेंडूत १६ धावा केल्यानंतर कुमार कार्किकेयने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यष्टीरक्षक इशान किशनने २६ आणि टीम डेविडने २० धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एकालाही २० धावांचा आकडा शिवता आला नाही. कर्णधार रोहित शर्माही २ धावा करून तंबूत परतला. मात्र, शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या डॅनियल सॅम्सने पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार मारत मुंबईला विजय मिळवून दिला.
यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून ‘जोस द बॉस’ म्हणजेच जोस बटलरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५२ चेंडूंचा सामना करताना ६७ धावा केल्या. त्याने या धावा करताना ४ षटकार आणि ५ चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त फक्त रविचंद्रन अश्विनला २१ धावा करता आल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार संजू सॅमसन फक्त १६ धावा करून तंबूत परतला.
मुंबईकडून यावेळी गोलंदाजी करताना ऋतिक शोकीन आणि रिले मेरेडिथ यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शोकीनने ३ षटके गोलंदाजी करताना ४७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तसेच, मेरेडिथने ४ षटकांच्या गोलंदाजीमध्ये २४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. या दोघांव्यतिरिक्त डॅनियल सॅम्स आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. या विजयामुळे मुंबईच्या खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. मात्र, या पहिले ८ सामने गमावल्यामुळे मुंबईने पुढील ५ सामनेही जिंकले, तरीही त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता येणार नाही.