अखेर प्रतीक्षा संपली!: अहमदनगरचा उड्डाणपूल नोव्हेंबर अखेरपर्यंत खूला होणार; दक्षिणचे खासदार विखेंची माहिती


अहमदनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरातून जात असलेला तीन किलोमीटरचा उड्डाणपूल नोव्हेंबर अखेरपर्यंत खूला होणार आहे. अशी माहिती अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी ( 03 ऑक्टोबर) दिली.

Advertisement

पत्रकार परिषदेत दिली माहिती

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या बैठकीनंतर महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले खासदार विखे म्हणाले, अहमदनगर शहरात सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे उड्डाणपुलाच्या उताराच्या बाजूला रॅम्प टाकण्याच्या कामाला विलंब होत आहे. निश्चित वेळेपेक्षा अधिकचे 20 दिवस या उड्डाणपुलाच्या कामाला लागणार आहे. पावसाचे पाणी वारंवार साचत असल्यामुळे कामाला अडचणी येत आहेत.

Advertisement

दिवाळीनंतर काम पुर्ण होणार

दिवाळीनंतर काम पूर्ण होऊन नोव्हेंबर अखेर हा उड्डाणपूल सुरू होईल. असे विखे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2022-23 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनांसाठी 557 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी 144 कोटी 40 लाख, आदिवासी उपाययोजनांसाठी 52 कोटी 52 लाख असे 753 कोटी 52 लाख इतके नियतव्यय मंजूर करण्यात आलेली आहे.

Advertisement

एवढा खर्च केला निधी

2021 -22 या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या 700 कोटी 41 लाखांचा निधी प्राप्त होऊन मार्च अखेर शंभर टक्के हा निधी खर्च झाला आहे. असे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. ते म्हणाले, जनावरावरील लंम्पी या आजारासाठी लागणाऱ्या औषध उपचारासाठी जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अकोला तालुक्यातील आंबड येथील हनुमान देवस्थान, नेवासे तालुक्यातील खरवंडी येथील संगमेश्वर देवस्थान मंदिर या तीर्थक्षेत्रांना क तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे.दोन्ही गटाचे मिळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडे कुठलाही विचार नाही. खरी सेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे. असे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

Advertisement

नदीपात्रातील अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी राज्य सरकार तेलंगणा, कर्नाटक या राज्याच्या धर्तीवर नवीन धोरण आणणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वाळू चोरी व वाहतूक रोखण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येणार आहे असे राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement