पुणे7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड पाेलीस आयुक्तालयाचे हद्दीत अग्निशास्त्राचा वापर करुन गंभीर गुन्हे घडत असल्याने, त्यास प्रतिबंध करण्याचे उद्देशाने पिंपरी चिंचवड पाेलीस आयुक्त यांनी अवैधरित्या अग्निशास्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार खंडणी विराेधी पथकाने रेकाॅर्डवरील दाेन सराईत गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून एक लाख २० हजार रुपये किंमतीचे तीन पिस्टल व तीन काडतुसं जप्त केली आहे.
सुनील बाळासाहेब खेंगरे (वय-३८,रा. चिंचवड,पुणे) व अभिजीत अशाेक घेवारे (३५,रा.काळेवाडी,पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. पाेलीस अंमलदार अशिष बाेटके व प्रदीप गाेडांबे यांना सदर आराेपी हे चिंचवड मधील वाल्हेकरवाडी परिसरात एस.के.वाॅशिंग सेंटरजवळ असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार पाेलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन पिस्टल मिळून आले आहे.
याबाबत आराेपीवर चिंचवड पाेलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३ (२५) , महाराष्ट्र पाेलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक आराेपी सुनील खेंगरे हा पाेलीस रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरुध्द दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल आहे. सदरची कारवाई खंडणी विराेधी पथकाचा अतिरिक्त कार्यभार असलेले पाेलीस निरीक्षक संताेष पाटील, सहा.पाेलीस निरीक्षक उध्दव खाडे, पाेलीस अंमलदार प्रदीप गाेडांबे, अशिष बाेटके, सुनील कानगुडे, किरण काटकर,पाेहवा नागेश माळी यांचे पथकाने केली आहे.
गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी दाेघे गजाआड
पिंपरी चिंचवड पाेलीस आयुक्तालयाचे हद्दीत १६ ते २९ मे दरम्यान दगड, अथवा शस्त्रे, अस्त्रे, साेटे, तलवारी, भाले, लाठी, बंदुक किंवा शारिरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी काेणतीही वस्तु बराेबर नेणे अथवा बाळगणे बाबत मनाई आदेश आहे. परंतु सदर आदेशाचा भंग करुन, काेणताही परवाना नसताना दाेनजणांनी त्यांचे ताब्यात २४ हजार रुपये किंमतीची एक लाेखंडी गावठी पिस्टल व दाेन जिवंत काडतुसे साेबत बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी किरण रमेश गालफाटे (वय-२२) व राेहन जयदीप चव्हाण (१९, दाेघे रा. मंगळवार पेठ,पुणे) या दाेन आराेपींना चिंचवड पाेलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या विराेधात पाेलीस शिपाई उमेश किशाेर माेहिते यांनी आर्मस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.