- Marathi News
- Local
- Maharashtra
- Pune
- Fraud In The Name Of CMO Office youth Arrested | Eknath Shinde Pimpri Chinchwad Crime Branch | Pune Fraud Case Update
पुणे26 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावे फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांच्या कार्यालयाकडुन हिंजवडी पोलीस ठाणे येथे २१ मे रोजी फिर्याद देण्यात आली होती की, राहुल राजेंद्र पालांडे या नावाचा व्यक्ती कोणत्याही शासकिय अधिकारी अथवा कर्मचारी नाही, तसेच तो महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही विभागात कोणत्याही पदावर कर्तव्यावर सुद्धा नाही. तरी सुद्धा त्याने सिम्बायोसिस एस. आय.बी.एम पुणे, लवळे, हिंजवडी व बंगलोर येथे सी.एम.ओ कार्यालयातील व्यक्ती असल्याचे फोन व्दारे सांगुन विद्यार्थ्यांचे अॅडमिशन करुन घेतले आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने तपास करत, संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्यास जेरबंद केली अशी माहिती पोलिसांनी दिली. राहुल पलांडे हा सीएमओ कार्यालयातील असल्याचे भासवण्याकरिता व लोकांची फसवणूक करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या बोधचिन्ह वापरत असलेल्या मोबाईलच्या टू कॉलर प्रोफाईलला तसेच वाॅट्सअॅप डीपीला त्याने बोध चिन्ह ठेवले.
त्याखाली सीएमओ कार्यालय महाराष्ट्र शासन मुंबई मंत्रालय अशी प्रोफाईल बनवून वाॅट्सअॅप स्लोगनमध्ये सीएमओपी, आरओ ऑफिस एकनाथ भाई शिंदे मुंबई मंत्रालय महाराष्ट्र शासन असा मजकुर ठेवला असल्याचे दिसून आले. तसेच त्याखाली मुंबई मंत्रालयाचे गुगल लोकेशन ठेवले व बनावट इमेल आयडी ठेवला आहे.
तो महाराष्ट्र शासनाचा कोणताही लोकसेवक नसतांना लोकसेवक असल्याची बतावणी करून फसवणूक करत होता. लोकसेवक वापरतो तसे ओळखचिन्ह वापरुन शासनाचे लौकिकास बाधा आणण्यासाठी त्याने संबंधित बोधचिन्हाचा वापर करुन त्याद्वारे विविध शिक्षण संस्थामध्ये विद्याथ्यांना प्रवेश मिळविण्यासाठी सदर बोध चिन्हाचा व बनावट नावाचा वापर करुन दबाव आणुन स्वतः चे आर्थिक फायदासाठी विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये अॅडमिशन मिळून दिले. याप्रकरणी त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची बाब ही गंभीर स्वरुपाची असल्याने पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शाखा युनिट-४ पिपरी चिंचवड याना या संदर्भाने तात्काळ कठोर कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोपी राहुल राजेंद्र पालांडे,( वय -३१ वर्षे, रा. केशवनगर, चिंचवड, पुणे )यास तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करुन तात्काळ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.न्यायालयाने त्यास २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.