पंजाब किंग्जने सनराईजर्स हैदराबादचे १५८ धावांचे आव्हान १५.१ षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यातच पार करत यंदाच्या आयपीएल हंगामातील आपला शेवटचा सामना जिंकून शेवट गोड केला. पंजाबकडून लिम लिव्हिंगस्टोनने २२ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. तर शिखर धवनने ३९ धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून फझलहक फारूकीने २ गडी बाद केले. तत्पूर्वी हैदराबादकडून अभिषेक शर्माने ४३ तर वॉशिंग्टन सुंदरने २५ आणि रोमरियो शेफर्डने नाबाद २६ धावा केल्या. पंजाबकडून नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. हरप्रीत ब्रार ला या योगदानासाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
सनराईजर्स हैदराबादचे १५८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादची सुरूवात खराब झाली. सलामीवीर जॉनी बेअरस्टो फझलहक फारूकीच्या गोलंदाजीवर २३ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या आक्रमक फलंदाज शाहरूख खानने पुन्हा एकदा निराशा केली. त्याला १९ धावांवर उमरान मलिकने बाद केले.
एका बाजूने शिखर धवनने डाव सावरला होता. मात्र हैदराबादचा कर्णधार मयांक अग्रवाल वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर सुचितकडे झेल देऊन अवघ्या १ धावेची भर घालून परतला. यानंतर शिखन धवन आणि लिम लिव्हिंगस्टोनने पंजाबला शतकी मजल मारून दिली. ही जोडी जमली असे वाटत असतानाचा फारूकीने शिखर धवनचा ३९ धावांवर त्रिफळा उडवला.
शिखर बाद झाल्यानंतर आलेल्या जितेश शर्मा आणि लियम लिव्हिंगस्टोनने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. शर्माने तर ७ चेंडूतच १९ धावा केल्या. मात्र त्याला सुचितने बाद करत पंजाबला पाचवा धक्का दिला. दरम्यानस लिव्हिंगस्टोनने आपला आक्रमक बाणा कायम ठेवत शेफर्ड टाकत असलेल्या १५ व्या सलग षटकात दोन षटकार आणि एक चौकार लगावत पंजाबला विजयाच्या जवळ पोहचवले. अखेर प्रेरक मंकडने चौकार लगावत सामना जिंकून दिला.