अकोल्यात 69 गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदोलन: शिवसेनेचा पुढाकार, पाणी पुरवठा योजनेच्या स्थगितीविरोधात गावकरी रस्त्यावर


अकोला21 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अकोल्यातील 69 गावांसाठी प्रस्तावित असणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला दिलेल्या स्थगितीविराेधात ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिंदे- फडणवीस सरकारच्या निर्णयाचा विरोध आदोलकांनी दर्शवला. शिवसेनेच्या नेत़ृत्त्वात होत असलेल्या आंदोलनात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Advertisement

नक्की प्रकरण काय?

दरवर्षी बाळापूर व अकाेला तालुक्यात पाणी टंचाई निर्माण हाेते.यासाठी जीवन मिशनअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली. या योजनेत जल बाळापूर तालुक्यातील 53 गावे, अकोला तालुक्यातील 16 गावे अशा एकूण 69 गावांचा समावेश आहे.

Advertisement

ठाकरे सरकारच्या काळात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषद गट नेते गाेपाल दातकर यांच्यासह या दाेन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात अनेक बैठका झाल्या. त्यानंतर तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात या याेजनेला सर्व मान्यता प्रदान करून निधीही मंजूर करण्यात आला. मात्र, आता पालकमंत्री स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यानंतरही त्यांनी जिल्ह्यातील याेजना स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान मंगळवारी सुरू झालेल्या धरणे आंदोलनात जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह अतुल पवनीकर, विकास पागृत ,दिलीप बोचे ,राहुल कराळे, उमेश अण्णा साखरे, गोपाल भटकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Advertisement

शिवसेनेकडून या आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या भिंतीला लागून मंडप टाकण्यात आले होते. तसेच ध्वनीक्षेपकासाठीही व्यवस्था करण्यात आली होती.

नक्की परिस्थिती काय?

Advertisement

१) 60 गावे पाणी पुरवठा याेजनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारने स्थगिती दिली.

२)याेजनेची किंमत 219 काेटी रुपये असून, प्रत्यक्ष याेजनेवर 192 काेटी रुपये खर्च हाेणार आहेत. त्यापैकि 108 काेटी रुपये खर्च झाले असून, कंत्राटदाराला 92 काेटीचे देयकही अदा करण्यात आले आहे.

Advertisement

३) याेजनेसाठी आतापर्यंत 101 किमीच्या कामांचे पाईप प्राप्त झाले असून, अंदाजे 70 कि.मी.पर्यंतचे पाईप अंथरण्यात आले आहेत.

अहवाल काय सांगतो?

Advertisement

प्रादेशिक पाणी पुरवठा याेजना तयार करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) वान धरणातून पुरवठा हाेणे व्यवहार्य असल्याचा अहवाल सादर केला आहे.

बाळापूर येथून जवळच कवठा येथे बॅरेज आहे. मात्र येथील पाण्याचा स्त्राेत शाश्वत नाही. बॅरेजमध्ये उन्हाळ्यात पाणीसाठा एकदम कमी होताे. त्यामुळे यातून 69 गावांना सातत्याने पाणी पुरवठा हाेणे शक्य वाटत नाही, असे मजीप्राने सांगितले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement