अकोला3 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने महापालिका मालमत्ता कर विभागाने महापालिकेच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण झोन एकुण पाच मालमत्तेला सिल लावण्यात आले. दरम्यान थकीत कराचा भरणा नागरिकांनी करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महापालिकेसमोर आर्थिक वर्ष संपुष्टात येत असताना महापालिकेला कोट्यवधी रुपयाच्या कर वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे महापालिकेने थकीत तसेच चालु आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
उत्तर क्षेत्रातील बुरड गल्ली, जुना कॉटन मार्केट येथील वार्ड क्रं. सी-3 मालमत्ता क्रं. 1044 धारक रशीदाबी जौजे जाफर खां, गजानन गुड्स गॅरेज यांचे कडे सन 2017-18 ते सन 2022-23 पर्यंतचा 1 लाख 33 हजार 894 रुपये कर थकलेला होता.
दक्षिण झोन मधील गिरी नगर, अकोला येथील वार्ड क्र. डि-2 मा.क्र. 613 लक्ष्मी मसने व अरुण जुमळे यांचे कडे सन 2017-18 ते सन2022-23 पर्यतचा 85 हजार 488 रुपये तसेच पुर्व झोन अंतर्गत रतनलाल प्लॉट, ब्लॅक बॅरी मधील वार्ड क्र. ए-4 देवाणी बिल्डर्स यांच्या कडे 2017-18 ते 2022-23 पर्यतचा 25 हजार 899 रुपये एवढा कर थकीत होता.
थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत वारंवार सुचना करुनही थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने मालमत्तांना सिल लावण्यात आले. ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे, सहा. कर अधिक्षक प्रशांत बोळे, जप्ती पथक प्रमुख विजय बडोणे, पथक प्रमुख कु. नंदिनी दामोदर, सहा.कर अधिक्षक हेमंत शेळवणे, आदीनी केली.