अकोला मनपातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन: सहा वर्ष लोटूनही महापालिकेत समायोजन केले नाही म्हणून आंदोलनाचा बडगा


अकोलाएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महापालिकेची हद्दवाढ होवून सहा वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही ग्राम पंचायतीतील कर्मचाऱ्यांना महापालिकेत समायोजन न केल्याच्या निषेधार्थ अकोला महापालिका वाढीव हद्दीतील ग्राम पंचायत कर्मचारी कृती समितीने सोमवार दि.23 पासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

Advertisement

31 ऑगस्ट 2016 रोजी महापालिकेची हद्दवाढ झाली. हद्दवाढी सोबत विविध ग्राम पंचायतीतील स्थायी, अस्थायी कर्मचारी महापालिकेने रुजु करुन घेतले. मात्र या कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी सेवेत सामावुन घेतले नाही. कायम आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जात आहे. तर ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना दरमहा केवळ १२ हजार रुपये मानधन दिले जात आहे.

याबाबत अकोला महापालिका वाढीव हद्दीतील ग्राम पंचायत कर्मचारी कृती समितीने महापालिका आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापतींना वारंवार निवेदन दिले. धरणे आंदोलने केली. मात्र सहा वर्ष लोटूनही या 31 कर्मचाऱ्यांना महापालिकेने कायम आस्थापनेवर सामावुन घेतलेेले नाही. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

Advertisement

या अनुषंगाने अकोला महापालिका वाढीव हद्दीतील ग्राम पंचायत कर्मचारी कृती समितीने ३ जानेवारी रोजी आयुक्तांना निवेदन देवून ग्राम पंचायतीतील कर्मचाऱ्यांना कायम आस्थापनेवर सामावुन घेण्याची विनंती केली होती. 22 जानेवारी पर्यंत याबाबत निर्णय न घेतल्यास 23 जानेवारी पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगानेच अकोला महापालिका वाढीव हद्दीतील ग्राम पंचायत कर्मचारी कृती समितीने काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

आयुक्त यावर नेमका काय तोडगा काढतात? याकडे आता लक्ष लागले आहे. या काम बंद आंदोलनात विठोबा दाळू, प्रशांत देशमुख, जय गोरे, उल्हास उपासे, संजय घोलपकर, गजानन मोरे, प्रकाश धुकेकर, अरविंद पांडे, योगेश पागृत, गणेश भदे, आकाश इंगळे, गिरीश काललकर, संजय राठोड, गौतम वानखडे, शाम नकवाल, अनिल काळे, महेंद्र लंगोटे, प्रकाश गवई, देवलाल मेंगे, गजानन लिकरे, जयश्री देशमुख, मोतावंती बागडे, गजानन तायडे सहभागी झाले आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement