अकोला दंगल: धार्मिक भावना दुखावल्याचे स्क्रीन शॉट शेअर करून भडकवली दंगल


अकोला20 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक
  • मुख्य आरोपीला अटक, आजवर १४८ आरोपी निष्पन्न.
  • अकोल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

जुने शहर परिसरातील हरिहरपेठ, पोळाचौक येथे उसळलेली दंगल ही कटकारस्थान रचून होती. या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली आहे. या दंगलीत कुण्या संघटनांचा सहभाग होता का ?, याबाबत सखोल तपास सुरू अाहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

१३ मे रोजी रात्री दंगल उसळली होती. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याबाबत पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनेचा उलगडा करताना म्हटले की, १३ मे रोजी रात्री रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रारदार जमाव घेऊन गेला. आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचे संभाषणाचे स्क्रीन शॉट जमावाने पोलिसांना दिले. त्यानंतर ते स्क्रीनशॉट त्याने तेथूनच आपल्या धार्मिक गटातील ग्रुपवर शेअर केले. तेथून तो जमाव जुने शहर पोलिस ठाण्यापर्यंत पोहाेचत नाही तोच तेथे जमाव हजर होता. त्या जमावाने जुने शहर पोलिस ठाण्याच्या परिसरातील हरिहर पेठ, पोळा चौक व इतर ठिकाणी जाळपोळ व दगडफेक करून लोखंडी पाइप, काठ्यांनी दुसऱ्या गटाच्या लोकांच्या घरात घुसून तसेच शासकीय व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या मारहाणीमध्ये विलास महादेवराव गायकवाड (४० रा. हरिहर पेठ) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आतापर्यंत १४८ आरोपी निष्पन्न झाले आहेत.
खुनासह दंगलीचे सहा गुन्हे दाखल
१३ मे रोजी रामदासपेठ पोलिस ठाण्यात कलम १५३ अ, २९५ अ, १८८,१२० अ, ५०५ नुसार जमावाविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात ४४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर जुने शहर पोलिस ठाण्यात कलम ३०२, १४३,१४७,१४८,१४९, शासकीय कामात अडथळा आणणे, दंगल व्हावी म्हणून कट रचणे असे चार गुन्हे दाखल केले आहेत. त्यात १४८ आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात आले.
मुख्य तक्रारदारच आरोपी, त्यानेच चॅट केले व्हायरल
१२ मेच्या मध्यरात्री तक्रारदार युवक हा दुसऱ्या युवकासोबत चॅटींग करत होता. त्यात समोरच्याने धार्मिक भावना दुखावतील असे चॅटींग केले. या दोघांतील वैयक्तीक चॅटींगचे स्क्रीनशॉट घेऊन हा युवक जमावासह १३ मे रोजी रात्री रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. त्याने तक्रार दिल्यानंतर ते चॅटींग व्हायरल केले व दंगल उसळली. मात्र वैयक्तिक चॅटींग व्हायरल करून दंगल घडवून आणल्याचा पोलिसांनी त्याच्यावर आता ठपका ठेवत त्यालाच मुख्य आरोपी बनवले. ज्या करण शाहू नामक व्यक्तीविरोधात आधी तक्रार देण्यात आली होती. त्यांंचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे पोलिस तपासात समोर आले.
१८ वर्षे वयोगटातील अधिक मुलांचा सहभाग
दंगलीमध्ये पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली त्यात १८ वर्षे वयोगटातील मुले अधिक आहेत. तर सहा अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपी हा अॅनिमेशन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून, तो मुंबईत शिक्षण घेत आहे.



Source link

Advertisement