अंधारे VS राणा: सुषमा अंधारे अमरावती लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार?, नवनीत राणांच्या अडचणी वाढणार?


अमरावती15 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाची मुलखमैदानी तोफ शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेला उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Advertisement

दरम्यान यामुळे अमरावतीत भाजपच्या सहयोगी खासदार नवनीत राणा आणि सुषमा अंधारे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाने केल्याचे दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाची बैठक घेण्यात आली. यात विधानसभा – लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाल्याची चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीत गेली अनेक वर्ष ज्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आणि अमरावती मतदारसंघावर शिवसेनेची पकड होती त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपूर्ण लक्ष असल्याचे दिसून येत आहे. आजच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांवर मोठी जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

अमरावती मतदार संघातून सुषमा अंधारे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव चर्चते आले आहे. शहरात सध्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याशी लढत होणार आहे.

शिवसेनेचे 2019 मध्ये 18 उमेदवार लोकसभेला निवडून आले होते. यात अनेक वर्ष शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेले छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे अनेक वर्षे खासदार होते. तर अमरावतीमध्ये 1999 पासून तर 2019 पर्यंत 20 वर्षे शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. यात अनंतराव गुडे, आनंदराव अडसूळ, यांन प्रत्येकी दोनदा निवडणुकीत विजयी होत शिवसेनेची सत्ता कायम राखली होती. मात्र, 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा या खासदार म्हणून अपक्ष निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी भाजपला सहकार्य करण्याचे ठरविले आहे. यामुळे आता ठाकरे गट आक्रमकपणे दोन्ही मतदारंसघात निवडणूक लढणार असल्याचे दिसून येत आहे.

AdvertisementSource link

Advertisement