वैरागएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
वैरागमधील छत्रपती शिवाजी चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारून दोन वर्षे झाली. मात्र प्रशासकीय पातळीवर अंतिम मान्यता न मिळाल्याने अद्याप अनावरण करण्यात आलेले नाही. छत्रपती शिवाजी चौकात पूर्वीच्या शिवस्मारक समितीला पुतळा बसवण्यासाठी वैराग ग्रामपंचायतीने २६ आक्टोंबर २०१० रोजी जागा देऊन ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्याठिकाणी ८ फेब्रुवारी २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास अचानक पुतळा बसवण्यात आला. मात्र पुतळा अनधिकृतरीत्या बसवला म्हणून प्रशासनाच्या आदेशानुसार पुतळा झाकून ठेवला. नऊ फेब्रुवारी रोजी वैराग मधील अनेक नेते , प्रतिष्ठित नागरिक यांच्यावर संशयित म्हणून अनाधिकृतपणे पुतळा बसल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. दरम्यानच्या काळात ९ फेब्रुवारी रोजी एक पुतळा समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर पुढे काय झाले नाही. यंदा हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.