अंतिम चार संघात मुंबई इंडियन्सला आहे का असेल तर कशी? जाणून घ्या समीकरण…

अंतिम चार संघात मुंबई इंडियन्सला आहे का असेल तर कशी? जाणून घ्या समीकरण...
अंतिम चार संघात मुंबई इंडियन्सला आहे का असेल तर कशी? जाणून घ्या समीकरण...

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स सध्या अतिशय वाईट काळातून पुढे जात आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही, आयपीएल २०२२ला सुरूवात होण्याआधी पाच विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्स संघाची अशी अवस्था होईल याचा कोणी विचार देखील केला नव्हता. स्पर्धेच्या इतिहासात एखाद्या संघाने सुरुवातीचे ८ सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबई इंडियन्सच्या कामगिरीनंतर त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. मुंबईच्या फक्त ६ लढती शिल्लक आहेत. या लढतीत विजय मिळवला तरी ते प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने आतापर्यंत ८ सामने खेळले असून त्यापैकी सर्व गमावले आहेत. त्याचे नेट रनरेट वजा १.००० इतके असून जे सर्वात कमी आहे. उर्वरित सहा सामन्यात जरी त्यांनी विजय मिळवला, सध्याचा संघाचा फॉर्म पाहता अशक्य वाटते. तरी देखील त्याचे १२ गुण होती आणि इतक्या गुणांसह मुंबईचे प्ले ऑफमध्ये पोहोचणे फारच अशक्य आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात कमीत कमी १४ गुण मिळवणारे संघ प्ले ऑफमध्ये पोहोचले आहेत. १४ गुण मिळवणारे संघ एका पेक्षा अधिक असतील तर नेट रनरेट महत्त्वाचे ठरते. मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले असे अधिकृत जाहीर झाले नाही. मात्र तशी शक्यता देखील फार कमी आहे.

Advertisement

मुंबई इंडियन्सनंतर गुणतक्त्यात सर्वात वाईट परिस्थिती चेन्नई सुपर किंग्जची आहे. त्यांनी ७ पैकी दोन सामने जिंकले आहेत. जर चेन्नईने यापुढील सर्व सामने जिंकले तरच त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचता येईल. सध्या गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाचे प्रत्येकी १० गुण झाले आहेत.

Advertisement