अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन: माेबाईल फाेन केले परत, अहवालावर बहिष्कार


अकोला29 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आशा स्वयंसविका – गट प्रवर्तकांना मानधन वाढावे, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकन शुक्रवारी माबाईल फोन परत करीत आंदालन छेडले. बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात (नागरी प्रकल्प -१) अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ११३ मोबाईल फोन परत करीत निषेध नोंदवला. नवीन मोबाईल मिळेपर्यंत अहवालावर बहिष्कार, मोबाईलवरील काम बंद सुरूच राहिल, असेही आयटकने स्पष्ट केले आहे.

Advertisement

शासनाने ऑनलाईन कामकाजासाठी अंगणवाडी सविकांना दिलेले मोबाईल फोन कुचकामी ठरले आहेत. या मोबाईची वाँरटी संपलेली असून हँग होणे, बंद पडणे, डिसप्ले जाणे असे प्रकार घडत आहेत. मोबाईल दुरुस्तीचा ४ – ५ हजारांचा भुर्दड अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच बसत आहे. त्यामुळे आंगणवाडी कर्मचाऱ्यांनी १७ ऑगस्ट २०२१ पासून मोबाईल फोन परत करण्यास सुरूवात केली. मात्र सन २०२२ अर्थसंकल्पीय अधिवशनात मोबाईल फोनसाठी महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये मंजूर केले. तसेच मानधन, वेतनवाढ, पेंशन देण्याबाबत प्रस्ताव तयार कला होता. मात्र, आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही.

परिणामी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने आंदोलन कोले. आंदालनात रमेश गायकवाड, सुनीता पाटील, नयन गायकवाड, सुरेखा ठोसर, आदी सहभागी झाल्या.

Advertisement

याआहेत मागण्या

  • दिवाळीपूर्वी मानधन, वेतनात भरीव वाढ करण्यात यावी.
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन दर्जेदार मोबाईल फोन किंवा टॅब द्यावा.
  • ऑनलाईन कामाच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ करण्यात यावी.
  • पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थ्यांच्या आधारकार्डची जोडणी केली नाही, तरी त्यांना आहारापासून वंचित ठेवू नये, या उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदशाचे पालन व्हावे.
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी लागू करावी. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा.
  • एकात्मिक बाल विकास योजनची सर्व उद्दिष्ट लक्षात ठवून अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घ्यावा.
  • वस्तीपातळीवरील अंगणवाडीच कामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा निर्णय घेताना संघटनांशी चर्चा विचार विनिमय करावा.
  • एकरकमी सवासमाप्ती लाभाची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावीत.आहाराच्या दरात वाढलली महागाई लक्षात घेवून वाढ करावी.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement